IND vs ENG: गिलला बाद करणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानशी काय संबंध? कर्णधाराला सर्वोच्च धावसंख्या करण्यापासून रोखलं!

भारत आणि इंग्लंड (Test Series IND vs ENG) संघामध्ये कसोटी सामन्यातील दुसरा दिवस सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल (Shubman gill) आणि उपकर्णधार रिषभ पंत (Rishbh Pant) या दोघे मिळून शानदार फलंदाजी करत होते, पण पहिल्या सेशनमध्येच कर्णधार गिलची विकेट पडली आणि तो त्याची सर्वोच्च धावसंख्या करण्यापासून मागे राहिला. इंग्लंडचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने (Shoib Bashir) गिलला बाद केले.

भारतीय कर्णधाराला बाद केलेल्या गोलंदाज शोएब बशीरचा पाकिस्तानशी काहीतरी संबंध आहे, शोएब बशीरचा जन्म इंग्लंडमध्ये झाला आहे, पण पाकिस्तानने कब्जा केलेल्या कश्मीर क्षेत्राशी सुद्धा त्याचा संबंध आहे. त्याचे आई-वडील या जागेची जोडलेले आहेत, या कारणाने शोएब बशीर पाकिस्तानी मूळचा ब्रिटिश खेळाडू आहे.

कर्णधार गिलने 227 चेंडूंमध्ये 147 धावांची कर्णधार पारी खेळली. सामन्याच्या पहिल्या दिवशी शतक झळकावल्यानंतर त्याने बरेच रेकॉर्ड त्याच्या नावावर केले. गिल कर्णधार म्हणून त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. या यादीमध्ये विजय हजारे (Vijay Hazare), सुनील गावस्कर (Sunil Gavaskar), दिलीप वेंगसकर (Dilip Vengaskar) आणि विराट कोहलीचे (Virat Kohli) नाव सुद्धा सामील आहे.

गिलने 147 धावांची शानदार पारी खेळली, पण तो कर्णधार म्हणून त्याचा पहिल्या सामन्यांमध्ये 75 वर्षांपूर्वीच जुनं रेकॉर्ड मोडण्यापासून चुकला. भारतीय क्रिकेटचे दिग्गज खेळाडू विजय हजारे यांनी 1991 मध्ये दिल्लीमध्ये इंग्लंड विरुद्ध 164 धावांची नाबाद पारी खेळली होती. हा त्याचा कर्णधार म्हणून पहिला सामना होता, जर गिलने 17 धावा अजून केल्या असत्या तर त्याने 75 वर्षांपूर्वीच जुन रेकॉर्ड तोडण्यात यशस्वी झाला असता. तसेच गिलने 147 धावांसहित टीम इंडियाला मजबूत परिस्थितीमध्ये नेऊन ठेवलं आहे.

Comments are closed.