ड्यूक बॉलची किंमत किती? वजन किती? फक्त इंग्लंडमध्येच वापरतात का? जाणून घ्या एका क्लिकवर
ड्यूक बॉल टेस्ट क्रिकेट: सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले गेले आहेत. या मालिकेत ‘ड्यूक’ बॉलनेच सामने खेळले जात आहेत. ‘ड्यूक’ बॉल सध्या चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही संघांनी या चेंडूच्या लवकर खराब होण्याची तक्रार केली होती. यानंतर, चेंडू बनवणाऱ्या कंपनीने याची चौकशी करण्याचे म्हटले आहे. या चेंडूचा वापर इंग्लंडशिवाय इतर देशांमध्येही होतो आणि हा चेंडू खूप महाग असतो. (Duke Ball Test Cricket)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या चेंडूचे वजन नियमांनुसार निश्चित केले जाते. ‘ड्यूक’ बॉलच्या वजनाबद्दल बोलायचे झाल्यास, ते 155 ग्रॅम ते 163 ग्रॅम पर्यंत असते. चेंडूचा आकार आणि वजन आयसीसीच्या नियमांनुसारच असते. (International Cricket Ball Rules)
रिपोर्ट्सनुसार, या चेंडूसाठी चामडे स्कॉटलंडमधून मागवले जाते. चामड्याची जाडी 4 मिलीमीटर ते 4.5 मिलीमीटरपर्यंत असते. ‘ड्यूक’ बॉल ब्रिटिश क्रिकेट बॉल्स लिमिटेड (British Cricket Balls Limited) कंपनी बनवते. एक चेंडू बनवण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. याची किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या दरम्यान असते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक प्रकारच्या चेंडूंचा वापर होतो, यात ‘ड्यूक’ बॉल एक आहे. कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडमध्ये याच बॉलचा वापर होतो. ‘ड्यूक’ बॉलचा वापर इंग्लंडशिवाय आणखी 2 देशांमध्ये होतो. वेस्ट इंडीज आणि आयर्लंडचे संघ ‘ड्यूक’ बॉलनेच कसोटी सामने खेळतात. (West Indies Ireland Test)
‘ड्यूक’ बॉलची शिलाई मशीनने नाही, तर हाताने केली जाते. ‘ड्यूक’ बॉलची सीम दीर्घकाळ व्यवस्थित राहते. हा चेंडू बराच काळ कडक राहतो आणि त्याचा आकार लवकर बदलत नाही. वेगवान गोलंदाजांना या चेंडूने अधिक मदत मिळते. परंतु, यात गोलंदाजाची कौशल्ये देखील महत्त्वाची ठरतात. (Fast Bowling Duke Ball)
Comments are closed.