अभिषेक शर्माच्या स्पेशल L सेलिब्रेशनचा अर्थ काय? स्टार फलंदाजने उघडलं यामागचं रहस्य

Asia Cup 2025: भारतीय संघाने पाकिस्तानला लीग स्टेजनंतर सुपर-4 मध्येही चांगलेच पराभूत केले.(The Indian team also defeated Pakistan well in the Super-4 after the league stage) या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्माने अफलातून कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यांत अभिषेकने डावाच्या सुरुवातीला मोठा प्रभाव टाकला. सुपर-4 च्या सामन्यात अभिषेकने दमदार अर्धशतकी खेळी करून आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याने आपल्या चाहत्यांना खास L सेलिब्रेशनचा अर्थही समजावून सांगितला.

पाकिस्तानविरुद्ध जेव्हा टीम इंडिया 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरली, तेव्हा अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. त्यांनी 39 चेंडूत 74 धावांची खेळी केली, ज्यात 6 चौकार आणि 5 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. याच खेळीत अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेकने खास L सेलिब्रेशन केले. सामन्यानंतर याबाबत त्यांच्या कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी विचारले असता, अभिषेक म्हणाले, “हे L आहे, L म्हणजे प्रेम. हा जल्लोष त्या लोकांसाठी आहे जे भारतीय क्रिकेट संघावर प्रेम करतात.” हे सेलिब्रेशन अभिषेक आयपीएल 2025 दरम्यानही करताना दिसले होते, त्यामुळेच याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही रंगली आहे.

सलामी जोडीदार शुबमन गिलसोबत अभिषेकचे नाते उत्तम आहे. (Abhishek has a great rapport with his opening partner Shubman Gill) बीसीसीआय टीव्हीवर सूर्यकुमार यादव यांच्याशी याबाबत बोलताना अभिषेक म्हणाला,
“अंडर-12 मध्ये आम्ही एका गोष्टीवर चर्चा करायचो आणि आजही त्याच गोष्टीवर बोलतो. कारण आम्ही एकमेकांना इतके चांगले ओळखतो की मला आधीच समजतं तो कधी शॉट खेळणार, कोणता शॉट खेळणार. त्याला देखील माहीत असते की मी कोणता शॉट मारू शकतो. त्यामुळे फक्त नजरेच्या इशाऱ्यावरच सगळं होतं. मी त्याला सांगितले आहे की आधीच मला सांगून ठेव, म्हणजे मी तयार राहीन. कधी कधी आपण अपेक्षा करत नाही की तो मऊ हाताने खेळेल, पण तो आपल्या कौशल्याने नक्कीच असे करतो. मात्र, मी यावर अजून काम करत आहे.”

Comments are closed.