What measures have been taken in the Melghat malnutrition case, question to Chief Minister Devendra Fadnavis in marathi


Malnutrition In Melghat : अमरावती : अमरावती मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर 2024 मध्ये 10 हजार कुपोषित बालके आढळली आहेत. काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या माजी महिला तसेच बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारने यावर काय उपाययोजना केल्या, असा सवाल केला आहे. (what measures have been taken in the Melghat malnutrition case, question to Chief Minister Devendra Fadnavis)

माहिती अधिकारातून मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर 2024 मध्ये 10 हजार कुपोषित बालके आढळल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2024 या महिन्यात धारणी तालुक्यात शुन्य ते 5 वर्षे वयोगटातील एकूण 20 हजार 380 बालकांपैकी 14 हजार 126 सर्वसाधारण वजन व उंचीची होती. 4 हजार 964 बालके कमी वजनाची तर 1 हजार 290 बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण 6 हजार 254 बालके कुपोषित होती. चिखलदरा तालुक्यातील 13 हजार 964 बालकांपैकी 9 हजार 860 बालके सर्वसाधारण वजन व उंचीची तर 3 हजार 316 बालके कमी वजनाची, 788 बालके तीव्र कमी वजनाची अशी एकूण 4 हजार 104 बालके कुपोषित होती.

हेही वाचा – Pahalgam Terrorist Attack : महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

कुपोषणाच्या प्रश्नाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने यावर उपाययोजना केल्या असल्याचे स्पष्ट केले आहे, यावर यशोमती यांनी सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आबिटकर यांना नेमक्या काय उपाययोजना केल्या, असा सवाल केला आहे.

मेळघाटमधील कुपोषणाचा प्रश्न गंभीर

मेळघाटमधील बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न अतिशय गंभीर असून ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे ठाकूर यांनी म्हटले. एका महिन्यात जर एवढी कुपोषित बालके आढळत असतील तर तत्पूर्वी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या नेमक्या काय करण्यात आल्या? अशी विचारणाही ठाकूर यांनी केली. याची अधिकची दखल शासन-प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

आढावा घेऊन मंत्र्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना उपाय योजनांचे आदेश द्यावेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून आढावा घ्यावा आणि मेळघाटातील कुपोषण, उपजत मृत्यू आणि मातामृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.



Source link

Comments are closed.