सोनाक्षी सिन्हाने 95 किलो वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय निवडला, वाचा
दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती झहीर इक्बाल कायमच आपले रिल्स आणि त्यांच्या व्हिडीओद्वारे मनोरंजन करत असतात. सध्याच्या घडीला आपल्याला दिसणारी ही फीट सोनाक्षी कोणेकाळी चांगलीच जाडी होती. वजन कमी करण्याचे मनावर घेतल्यावर सोनाक्षीने सर्वात महत्त्वाचा पर्याय निवडला तो पिलेट्सचा. सोनाक्षीचे वजन हे आधी 95 किलो होते. ते आता सध्याच्या घडीला 60 इतके झालेले आहे.
सोनाक्षीने तिच्या वजन कमी करण्याविषयी मुद्द्यावर भारती टीव्ही पाॅडकास्टवर अनुभव सांगितला. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंग यांच्यासोबत गप्पा मारताना तिने विविध विषयांवर गप्पा मारल्या. यामध्ये खासकरुन तिने वजन कसे कमी केले यावेळी तिला कोणत्या गोष्टींमधून जावे लागले अशा विविध गोष्टींवर चर्चा केली.
सोनाक्षी म्हणते, कोणत्याही व्यक्तीसाठी, वजन कमी करण्याचा प्रवास आव्हानात्मक असतो. वजन कमी करण्यासाठी दृढनिश्चय आणि उत्साहाची आवश्यकता असते. मी लहानपणापासूनच जाड असल्याने, वजन कमी करण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली होती. मला वजन करण्यासाठी तब्बल अडीच वर्षे घालवावी लागली होती.
सोनाक्षी 18 वर्षांची असताना ट्रेडमिलवर 30 सेंकंद सुद्धा धावू शकत नव्हती. त्यानंतरच तिने ठरवलं की, हे असे जीवन जगायचे नाही. यावर अधिक बोलताना सोनाक्षी म्हणते, वजन कमी करण्याच्या विचाराने तुमचे वजन कमी होत नाही. म्हणूनच तिने योगा, जिम आणि कार्डिओ व्यायामापासून ते पायलेट्स आणि वेट ट्रेनिंगपर्यंत सर्व काही करून पाहिले.
दबंग गर्लने 30 किलो वजन कमी करण्याबद्दल सविस्तर सांगितले. ती म्हणाली, “मी सहा महिन्यांपूर्वी पिलेट्स करायला सुरुवात केली आणि ते मला खरोखरच जमले. त्या मशीनवर तुम्ही हजारो व्यायाम करू शकता, त्यामुळे ते कधीही कंटाळवाणे नसते. आपण दररोज काहीतरी नवीन करू शकतो. म्हणूनच मला पिलेट्स रिफॉर्मरवर व्यायाम करायला आवडते. “
सध्या तिचे थोडे वजन वाढल्यामुळे, ती गरोदर असल्याच्या अफवा या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. या प्रश्नावर ती हसत म्हणाली, “मी 16 महिन्यांपासून गरोदर आहे,”
Comments are closed.