ट्रेविस हेडच्या विकेटवर गोंधळ, अंपायरने शुबमन गिलला काय दिली ताकिद ?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यादरम्यान सर्वात जास्त चर्चा ट्रेविस हेडची होत होती. ट्रेविस हेड हा ऑस्ट्रेलियाचा प्रभावी फलंदाज आहे. पण वरूण चक्रवर्तीने त्याला 39 धावातच परत पाठवले. हेडचा कॅच शुबमन गिलने पकडला होता पण या दरम्यान त्याने काय केलं, ज्यामुळे अंपायर कडून त्याला ताकीद देण्यात आली.

सुरुवातीला ट्रेविस हेडने सुरुवात हळू केली होती पण नंतर तो त्याच्या अंदाजात आला. तो प्रत्येक चेंडूवर प्रभावी कामगिरी करत होता. यादरम्यान रोहित शर्माने 9 व्या षटकात वरूण चक्रवर्तीला गोलंदाजी करण्यासाठी पाठवले. तेव्हा वरूणने षटकाच्या पहिल्याच चेंडूत हेडला बाद केले. हेड षटकार लावण्याच्या तयारीत होता पण त्याचा चेंडू शुबमन ने पकडला आणि हेड बाद झाला. त्याने 33 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 39 धावा केल्या.

शुबमन गिलने लॉंग ऑन मध्ये त्याचा कॅच पकडला, यानंतर हेड परत गेला. पण अंपायरने शुबमन गिलला बोलावून घेतले आणि ताकीद दिली. चाहत्यांना कळाले नाही की नक्की हा काय विषय आहे? गिल कडून चूक झाली होती त्याने कॅच पकडल्यानंतर लगेचच चेंडू सोडून जल्लोष करण्यास सुरुवात केली. अंपायरने त्याला सांगितले की चेंडू पकडल्यानंतर काही वेळ तो हातात ठेवून मग सोडून द्यायचा असतो.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार स्टीव स्मिथने 73 धावा केल्या 96 चेंडूत त्याने चार चौकार आणि एक षटकार मारला.

हेही वाचा

IND vs AUS: सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीचा भीमपराक्रम , 3 विकेट्स घेत अक्रम-हरभजनला मागे टाकले!

भारताची धावांचा पाठलाग करताना धोकादायक आकडेवारी, आयसीसी वनडेमध्ये मोठी चिंता!

कोहलीसाठी स्टेडियममध्ये फॅन्सची गर्दी, विराटसाठी काय म्हणाले चाहते?

Comments are closed.