Parenting Tips: मुलांसाठी अभ्यासाची योग्य वेळ कोणती?

आपल्या मुलाने मन लावून अभ्यास करावा असे प्रत्यक्ष पालकांना वाटते. यासाठी तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. काही मुलांना सकाळी लवकर अभ्यास करायला आवडतो तर काही मुले हे रात्री अभ्यास करणे पसंत करतात. अनेकदा पालकांना मुलांसाठी अभ्यासाची योग्य वेळ कोणती? हा प्रश्न पडतो. त्याबद्दल आपण जाणून घेऊया…

शरीर घड्याळ

आपल्या शरीराचे एक नैसर्गिक घड्याळ असते ज्याला ‘बॉडी क्लॉक’ म्हणतात. यावरूनच आपल्या झोपेची वेळ, मेंदूची कार्य करण्याची क्षमता ठरत असते. काही मुले सकाळी तर काही मुले रात्री अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करू शकतात. त्यामुळे आपल्या मुलाच्या सवयी लक्षात घेऊन मुलांना अभ्यास करायला लावणे गरजेचे आहे.

सकाळी अभ्यास करण्याचे फायदे

सकाळी मूड फ्रेश असतो. रात्री चांगली झोप झाल्यावर ताजेतवाने वाटते. जर गणित, विज्ञान किंवा भाषा या विषयांचा अभ्यास करायचा असेल तर यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. सकाळी अभ्यास करणे कधीही चांगले असते. सकाळी केलेला अभ्यास लक्षात देखील राहतो.

रात्री अभ्यास करण्याचे फायदे

काही मुलांना रात्री अभ्यास करायला आवडते. रात्रीची वेळ शांत असते, आजूबाजूचा आवाज कमी असतो. त्यामुळे रात्री अभ्यास करणाऱ्या मुलांना एकट्याने आणि व्यत्ययाशिवाय अभ्यास करण्याची चांगली संधी मिळते. यावेळी लिखाण किंवा पाठांतर करणे चांगले असते.

विज्ञान काय?

शास्त्रज्ञांच्या मते, सकाळच्या वेळी स्मरणशक्ती चांगली राहते. मात्र तुम्ही तुमच्या मुलाची सवय ओळखून त्याला एकाच वेळ अभ्यास करायला सांगू शकता. कारण रोजच्या सवयीप्रमाणे मुलांचा मेंदू ते काम करण्यास सक्षम होत असतो.

Comments are closed.