RCB vs KKR सामना रद्द झाला तर फायदा कोणाचा? असं आहे प्लेऑफचं समीकरण
भारत-पाकिस्तान दोन्ही देशांतील सीमा तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. या स्थगितीनंतर आयपीएल 2025 आजपासून (17 मे) पुन्हा सुरू झाले आहे. त्यातील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा (RCB vs KKR) होणार होता, परंतु पावसामुळे टॉसला उशीर झाला आहे. पावसामुळे सामना रद्द घोषित केला जाऊ शकतो, जर असे झाले तर दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळेल. या परिस्थितीत बंगळुरू आणि कोलकाताच्या प्लेऑफ समीकरणावर काय मोठा परिणाम होईल ते जाणून घेऊया?
पॉइंट्स टेबलवर नजर टाकली तर, कोलकाता नाईट रायडर्स 12 सामन्यांत 5 विजयानंतर 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत, त्यामुळे त्यांचे कमाल गुण 15 पर्यंत पोहोचू शकतात. आज कोलकात्यासाठी ‘करो या मरो’ असा सामना आहे कारण जर ते आरसीबीविरुद्ध हरले तर ते प्लेऑफमधून बाहेर पडतील. केकेआरचा त्रास येथेच संपत नाही कारण बंगळुरूविरुद्धचा सामना रद्द झाला तरी ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडतील.
आरसीबी प्लेऑफच्या अगदी जवळ आहे. बंगळुरूने 11 सामन्यांत 8 विजय नोंदवले आहेत आणि 16 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीचे अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. जर बंगळुरूने आज कोलकाताविरुद्ध विजय मिळवला तर प्लेऑफमधील त्यांचे स्थान निश्चित होईल. आरसीबीसाठी चांगली गोष्ट म्हणजे जर केकेआरसोबतचा सामना रद्द झाला तर त्यांचे 17 गुण होतील, ज्यामुळे टॉप-4 मध्ये त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित होईल.
Comments are closed.