श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? रविचंद्रन अश्विनने दिलं उत्तर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या श्रेयस अय्यरने सध्या आपल्या फिटनेसवर काम करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या अनुपस्थितीत, टीम मॅनेजमेंटने नंबर 4 वर ऋतुराज गायकवाडला खेळण्याची संधी दिली. याचा फायदा घेऊन गायकवाडने आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक झळकावले. आता मोठा प्रश्न हा आहे की, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत नंबर 4 वर कोण फलंदाजी करणार?

सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाडला टीम मॅनेजमेंटने नंबर 4 वर खेळण्याची संधी दिली. रायपूर वनडेत शतक झळकावल्यानंतर आता गायकवाडला आणखी एक संधी मिळेल. या वनडे मालिके नंतर टीम इंडिया पुढची वनडे मालिका जानेवारी 2026 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्या मालिके पर्यंत श्रेयस अय्यरही फिट होऊ शकतो. अशा परिस्थितीत या दोघांपैकी कोणीतरी एकच नंबर 4 वर खेळू शकेल. वनडे फॉरमॅटमध्ये संघाचा उपकर्णधार असल्याने अय्यरला संधी मिळणे जवळजवळ निश्चित दिसत आहे. अशावेळी शतकवीर गायकवाडला पुन्हा एकदा बाहेर बसावे लागेल का? पुढच्या मालिकेत शुभमन गिलचेही प्लेइंग 11 मध्ये पुनरागमन होऊ शकते.

नंबर 4 वर ऋतुराज गायकवाड की श्रेयस अय्यर यावर सुरू असलेल्या चर्चेवर रविचंद्रन अश्विननेही भाष्य केले आहे. अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनलवर याबद्दल बोलताना म्हटले, ‘माझ्या मते, श्रेयस अय्यर आला तरीही गायकवाडला संधी दिली जाऊ शकते. मला पूर्णपणे माहिती नाही की हे कसे होईल, पण यासाठी अनेक पर्याय मनात येतात. तुम्ही गायकवाडला नंबर चारच्या वर पाठवू शकता का? याची खात्री नाही, पण तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि दीर्घकाळ खेळण्याचा हक्कदार आहे.’

Comments are closed.