IND vs SA: गौतम गंभीर काहीही बोलले तरी मला फरक पडत नाही..’ कृष्णमाचारी श्रीकांत गंभीरवर का संतापले?
भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे प्रशिक्षक गौतम गंभीर (Head Coach of team india) यांच्यावर टीका तीव्र होऊ लागली आहे. गुवाहाही कसोटीत भारतीय संघाची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे (test series IND vs SA). कोलकाता कसोटीत भारतीय संघाला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र या पराभवातून भारतीय संघाने धडा घेतला नाही. भारतीय संघाच्या ढिसाळ कामगिरीचं खापर श्रीकांत (Krishamachari Shrikant on Gautam Gambhir) यांनी गंभीर यांच्यावर फोडलं आहे.
‘मी भारताचा माजी कर्णधार आहे. निवडसमितीचा माजी अध्यक्ष आहे. गंभीरला माझ्याबद्दल जे म्हणायचं ते म्हणू शकतो, मला त्याने फरक पडत नाही. मी काय बोलतो आहे याचं भान मला आहे’, अशा तिखट शब्दात कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘अक्षर पटेल अंतिम प्लेइंग इलेव्हनमध्ये का नाही? तो कसोटी, वनडे आणि टी20 अशा तिन्ही प्रकारात सातत्याने खेळतो आहे. मग सातत्याने संघात बदल का? प्रत्येक सामन्यात कोणीतरी पदार्पण करतो. ट्रायल अँड एरर असं सगळं झालं आहे. गौतम गंभीर काहीही म्हणू शकतो, मला फरक पडत नाही.
काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज हर्षित राणाला (Harshit Rana) संघात स्थान मिळण्याबाबत श्रीकांत यांनी टीका केली होती. गंभीर यांचा आवडता असल्यामुळे हर्षितला स्थान मिळालं असं श्रीकांत म्हणाले होते. गंभीरने श्रीकांत यांना प्रत्युत्तर दिलं होतं. युट्यूब चॅनेल चालावा म्हणून वाट्टेल ते बोलू नये. हर्षितचे बाबा निवडसमितीत नाहीत. त्याने मेहनत करून इथपर्यंत वाटचाल केली आहे. त्याच्या निवडीसंदर्भात शंका उपस्थित करणं लाजिरवाणं आहे असं गंभीर म्हणाले होते.
ज्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी जोरदार धावा केल्या, त्याच खेळपट्टीवर भारताच्या फलंदाजांची परिस्थिती का बिघडली. नक्की काय चाललं आहे कळत नाही असं श्रीकांत म्हणाले. सिमोन हार्मेर (Simon Harmer & Keshav Maharaj) आणि केशव महाराज यांच्या फिरकीविरुद्ध भारतीय फलंदाजांची दाणादाण उडाली मार्को यान्सनच्या (Marco Yanson) 5 उसळत्या चेंडूवर भारतीय संघाने विकेट्स गमावल्या. ऋषभ पंतने (Rishbh Pant) आत्मघातकी फटका खेळला. नैसर्गिक खेळ वगैरे ठीक आहे पण संघाची स्थिती पाहून खेळायला हवं होतं. तो संघाचा कर्णधारही आहे. जे काही करायचं त्यात सातत्य हवं, असं श्रीकांत म्हणाले.
Comments are closed.