Indoor Workout : पावसामुळे जिमला जाता येत नाही? घरीच करा हे वर्कआऊट
पावसाळ्यातील थंड वातावरण बऱ्याचदा फिटनेस रुटीनमध्ये अडथळा निर्माण करते. दमट, ओलसर वातावरणामुळे कित्येकजणांना थकवा येतो तर काहीजणांना पावसामुळे जिमला जाणं शक्य होत नाही. भर पावसात जिमला जाणं तर दूरचं साधं जॉगिंग करणे, चालणे अशक्य वाटू लागते. अशा परिस्थितीत तुमच्या डेली फिटनेस रुटीनला ब्रेक मिळतो आणि नियंत्रणात असलेले वजन पुन्हा वाढू लागते. तुमच्याही बाबतीत असंच काहीसं घडतंय का? मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही घरीच कोणते इनडोअर वर्कआउट करता येतील याबद्दल माहिती सांगणार आहोत (Indoor Workout)
पुश-अप
पावसामुळे जिमला जाणं शक्य होत नसेल तर घरी पुशअप्सची प्रॅक्टिस करता येईल. पुशअप्स साधा आणि सोपा व्यायामप्रकार आहे. पुशअप्समुळे बाईस्पेस, ट्राइसेप्स आणि छातीचे मसल्स मजबूत होतात. तुम्ही दररोज 10 ते 15 पुशअप्स करू शकता.
स्क्वॅट्स (स्क्वॅट)
पुशअप्सप्रमाणे स्क्वैट्स करणे घरी करण्यासाठी उत्तम व्यायामप्रकार आहे. स्क्वैट्स केल्याने मसल्स मजबूत होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही साधनाची गरज तुम्हाला लागत नाही.
पायऱ्यांची चढ-उतार (Stairs Walk)
फिट राहण्यासाठी घरी करण्यासारखा व्यायामप्रकार म्हणजे पायऱ्यांची चढ-उतार करावी. यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल. जर तुम्ही दररोज 15 ते 20 मिनिटे पायऱ्यांची चढ-उतार केलीत तर तुम्हाला जिमला जाण्याची गरज भासणार नाही. तसेच तुमचं वजनही कंट्रोलमध्ये राहिल.
डान्स करणे (Dancing)
नाचणे हा देखील एक व्यायामप्रकार आहे. पावसात जिमला जाणं शक्य नसेल तर घरात आवडत्या गाणावर डान्स करावा. तुम्हाला जर बेली डान्स, झुंबा हे प्रकार येत असतील तर तेही करू शकता.
रश्शी उडी (Skipping Rope)
घरी करण्यासाठी दोरीच्या उड्या हा सोपा व्यायामप्रकार आहे. हा एक कार्डिओ वर्कआऊटचा प्रकार आहे. तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटे हा व्यायामप्रकार केल्यास वजन नियंत्रणात राहिल आणि शरीर एक्टिव्ह राहण्यास मदत होईल.
हेही पाहा –
Comments are closed.