मुंबईकरांना २४ तास साधं पिण्याचं पाणी देऊ शकलो नाही तर, मोठमोठ्या घोषणा करून उपयोग काय? वरुण सरदेसाई यांची सरकारवर टीका
मुंबईकरांना २४ तास साधं पिण्याचं पाणी देऊ शकलो नाही तर, मोठमोठ्या घोषणा करून उपयोग काय?, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार वरून सरदेसाई यांनी सरकारवर केली आहे. विधानसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.
विधानसभेत बोलताना वरून सरदेसाई म्हणाले की, “महाविकास आघाडीचं सरकार असताना मनोरीमध्ये डिसॅलिनेशन प्रकल्प व्हावा, अशी आमची इच्छा होती. मात्र आमचं सरकार गेल्यानंतर गारगाईचा ओव्हर अँड अबव्ह एस्टीमेटेड प्रकल्प राबवण्याचा का अट्टहास आहे?”
ते म्हणाले की, “म्हाडाच्या ५६ वसाहती पुनर्विकासासाठी जात असताना सेवा शुल्क न भरल्याने अनेक वसाहतींचा पुनर्विकास रखडला आहे. विकासक सांगतो तुम्ही भरा नाहीतर आम्ही ते कॉर्पस फंडमधून वसूल करू. सरकार सांगत आज न उद्या आम्ही ते माफ करू. माझी एवढीच विनंती आहे की केवळ साडे तीनशे रुपये शासनाने म्हाडाला भरले तर, आतापर्यंतचा सगळा सेवा शुल्क माफ होईल.”
Comments are closed.