आठ महिन्यांनी ROKO अॅक्शन मोडमध्ये, भारत-ऑस्ट्रेलिया सामना किती वाजता सुरु होणार, फुकटात कुठे प
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला एकदिवसीय सामना थेट प्रक्षेपण : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी पर्थ स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनावर असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरतील.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी-20 या दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असल्याने ते आता फक्त वनडे सामन्यांमध्येच चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतील. दरम्यान, या दौऱ्यापूर्वी रोहित शर्माकडून वनडे कर्णधारपदही काढून घेण्यात आले असून, शुभमन गिलला टीम इंडियाच्या वनडे संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी रोहित आणि कोहली हे गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे कधी, कुठे, किती वाजता सुरू होईल? (India vs Australia Live Telecast 1st ODI Update)
पहिला सामना रविवार, 19 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियातील पर्थ स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल. नाणेफेकसाठी दोन्ही संघांचे कर्णधार शुभमन गिल आणि मिचेल मार्श सकाळी 8:30 वाजता मैदानात उतरतील.
𝙍𝙚𝙖𝙙𝙮. 𝙎𝙚𝙩. 𝙍𝙚𝙡𝙤𝙖𝙙𝙚𝙙 🔃#TeamIndia कर्णधार शुभमन गिल आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श 1️⃣व्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भेटत आहेत 🏆#AUSWIN | @शुबमनगिल pic.twitter.com/MBPaB2iL0R
— BCCI (@BCCI) 18 ऑक्टोबर 2025
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना टीव्हीवर, लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल? (AUS vs IND 1ली ODI कुठे लाइव्ह स्ट्रीम करायची?)
एकदिवसीय मालिकेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. भारतीय चाहते जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतात.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोफत लाईव्ह कुठे पाहू शकतो?
बऱ्याच लोकांना माहिती नसेल की जेव्हा ते त्यांचे मोबाइल सिम रिचार्ज करतात. तेव्हा त्यांना मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील मिळते. पण, सर्व प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन समाविष्ट नाही. उदाहरणार्थ, 349 रुपयांच्या 28 दिवसांच्या रिचार्जमध्ये मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. यामुळे तुम्ही जिओहॉटस्टार प्लॅन खरेदी न करता भारत-ऑस्ट्रेलिया सामना मोफत पाहू शकता. दुसरीकडे, चाहत्यांना हा सामना डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर मोफत पाहता येईल.
एकदिवसीय मालिकेसाठी दोन्ही टीमचे संघ :
भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्ंधर), विराट कोहली, श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (यशिष्टरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, प्रसीध कृष्णा.
ऑस्ट्रेलियन संघ : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मार्नस लाबुशेन, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, मिचेल ओवेन, जोश फिलिप (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल स्टार्क, झेवियर बार्टलेट, जोश हेझलवुड, बेन द्वारशीस, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.
आणखी वाचा
Comments are closed.