IND vs AUS: उद्या रंगणार सेमीफायनलचा थरार! कधी आणि कुे

यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना मंगळवारी (4 मार्च) रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात खेळला जाईल. दरम्यान दोन्ही संघ अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आतापर्यंत दोन्ही संघानी एकही सामना गमावलेला नाही.

या कारणास्तव एक उत्तम सामना अपेक्षित आहे. हा सामना दुबईमध्ये होत असल्याने, या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. तथापि, कांगारू संघाने नेहमीच आयसीसी बाद फेरीत चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल.

सर्वांच्या नजरा आता या सामन्यावर खिळल्या आहेत. कारण दोन्ही संघ बलाढ्या आहेत. दरम्यान या सामन्याच्या लाईव्ह टेलिकास्टबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. अशा परिस्थितीत, या बातमीद्वारे आपण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील सेमीफायनल सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा याबद्दल आपण जाणून घेऊया.

भारत-ऑस्ट्रेलियास संघात सेमीफायनल सामना कधी होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामना मंगळवारी, (4 मार्च) रोजी दुबई येथे खेळला जाईल.

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील सेमीफायनल सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल.

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील सेमीफायनल सामना टीव्हीवर कुठे पाहायचा?
जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामना टीव्हीवर पाहायचा असेल तर तो स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर पाहता येईल.

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील सेमीफायनल सामना मोबाईलवर कुठे पाहायचा?

जर टीव्हीऐवजी मोबाईलवर हा सामना पाहायचा असेल तर तुम्ही जिओ हाॅटस्टारवर (JioHotstar) सामने पाहू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

थोडक्यात हुकला ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या हातून संधी निसटली!
पाकिस्तानची नाचक्की! सेमीफायनलपूर्वीच गद्दाफी स्टेडियमच्या छताला गळती, PCBची मोठी फजिती
मोठी बातमी: आयपीएल 2025 साठी अजिंक्य रहाणेची KKRच्या कर्णधारपदी निवड!

Comments are closed.