जम्मू -काश्मीरला राज्य कधी मिळाले?
फारुख अब्दुल्ला यांची केंद्र सरकारवर विचारणा
मंडळ / श्रीनगर
आज, 5 ऑगस्ट रोजी भारताच्या संविधानातून कलम 370 हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला 6 वर्षे पूर्ण होत असतानाच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा कधी मिळणार? गेल्या सहा वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये सुधारणा करण्याच्या नावाखाली त्यांनी (भाजपने) काय केले आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती करतानाच मला खात्री आहे की एक दिवस त्यांना हा निर्णय घ्यावा लागेल, असेही अब्दुल्ला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले. यापूर्वी पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला तेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती सुधारेल असा दावा करण्यात आला होता, परंतु सत्य काही वेगळेच आहे. असे मुफ्ती म्हणाल्या होत्या.
Comments are closed.