इराणविरुद्धचे युद्ध कधी संपणार? इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली महत्त्वाची माहिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्य पूर्वेतील देशात युद्धाची ठिणगी 28 फेब्रुवारीला पडली. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला एक महिना उलटला आहे. परंतु अजूनही हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. अमेरिकन वृत्तसंस्था न्यूजमॅक्स सोबत बोलताना, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी सांगितले की, या युद्धाने निम्म्याहून अधिक लष्करी उद्दिष्टे साध्य केली आहेत. नेतन्याहू यांनी युद्ध संपवण्यासाठी कोणतीही कालमर्यादा दिली नाही आणि ते सध्या सुरूच राहील असे संकेत दिले आहेत.

इराणविरुद्धच्या युद्धाने आपले निम्मेहून अधिक उद्दिष्ट साध्य केले आहे. हे युद्ध कधी संपेल यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. नेतन्याहूंच्या सोमवारच्या वक्तव्यावरून असे सूचित होते की, सध्या युद्ध संपवण्याच्या मनःस्थितीत ते नाहीत. नेतन्याहू म्हणाले की, त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, मोहिमेच्या दृष्टीने युद्ध पूर्ण झाले आहे, परंतु वेळेच्या दृष्टीने नाही. हे लक्षात घेतले पाहिजे की, इराणविरुद्ध इस्रायलला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी सुरुवातीला म्हटले होते की, हे युद्ध अंदाजे चार ते सहा आठवडे चालेल. दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी सोमवारी सांगितले की, युद्धामुळे तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत आणि अमेरिकन जनतेचा याला व्यापक विरोध असल्याने, हे युद्ध महिन्यांऐवजी आठवडेच चालण्याची शक्यता आहे.

नेतन्याहू यासंदर्भात अधिक बोलताना म्हणाले, अमेरिकेसोबत मिळून ते इराणचा शस्त्र उद्योग नष्ट करण्याच्या जवळ पोहोचले आहेत. ते इराणचा अणुकार्यक्रम तसेच त्याचा संपूर्ण औद्योगिक पाया उद्ध्वस्त करत आहेत. नेतान्याहू यांनी म्हटले आहे की, त्यांचा विश्वास आहे की इराणी राजवट अंतर्गतरीत्या कोसळेल, परंतु सध्या ते तिची लष्करी, क्षेपणास्त्र आणि आण्विक क्षमता कमी करून तिला आतून कमकुवत करत आहेत. नेतान्याहू आणि ट्रम्प यांनी वारंवार आरोप केला आहे की, इराण अण्वस्त्रे विकसित करण्याच्या जवळ आहे. या दाव्याला संयुक्त राष्ट्रांच्या आण्विक देखरेख संस्थेने पाठिंबा दिलेला नाही.

Comments are closed.