राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर माजी निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत? संजय राऊत यांचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतांची चोरी झाल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीव कुमार कुठे आहेत असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच कुमार यांना दिल्लीतही ठेवलं नसेल असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजज राऊत म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीवेळी राजीव कुमार हे निवडणूक आयुक्त होते. काल मी एक ट्वीट केलं होतं, निवडणूक आयुक्तांवर. त्यांच्या सहकार्याने मोदी निवडणूक जिंकू शकले ते निवडणूक आयुक्त कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. जगदीन धनखड बेपत्ता झाले आहेत तसे तत्कालीन निवडणूक आयुक्त कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे असे संजय राऊत म्हणाले.
तसेच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर हल्ले सुरू केल्यावर याचे उत्तर राजीव कुमार यांनी द्यायला पाहिजे होतं. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हे शिंदे गटाला दिलं घटनेविरुद्ध जाऊन आणि त्यात किती कोटींचा व्यवहार झाला हे सुद्धा मी सांगितलं होतं. राजीव कुमार या क्षणी कुठे आहेत हा माझा प्रश्न आहे. हा प्रश्न मी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यावर दिल्लीतही चर्चा सुरू झाली आहे. जगदीप धनखड जसे दिसत नाही तसे राहुल गांधी यांनी हल्ला केल्यापासून राजीव कुमार दिसत नाहियेत. कदाचित दिल्लीतही त्यांना ठेवलेलं नाही असा अंदाजही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
Comments are closed.