टीम बसमध्ये रोहित शर्माच्या त्या खास सीटवर आता ‘हा' खेळाडू बसतो, कुलदीप यादवचा खुलासा!

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्तीनंतर आता त्याच्या जागी कसोटी संघात त्याची जागा कोण घेऊ शकेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) कसोटी मालिकेत मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच कसोटी मालिकेच्या आधी कुलदीप यादवने (Kuldeep yadav) एक मोठा खुलासा केला आहे. कुलदीपने त्या खेळाडूबद्दल भाष्य केले आहे जो खेळाडू संघाच्या बसमध्ये रोहित शर्माच्या सीटवर बसतो.

कुलदीप यादवने मीडियाशी बोलताना त्या खेळाडूचं नाव सांगितलं आहे. भारतीय फिरकीपटूने (indian Spinner) सांगितले की, टीम बसमध्ये आता रोहितच्या जागेवर मी बसतो. कुलदीप म्हणाला, त्या खास जागेवर मी बसतो. मी कधीच रोहित भाईची जागा घेऊ शकत नाही. मी फक्त जड्डू (Ravindra Jadeja) भाईसोबत जास्त वेळ घालवत आहे. एका फिरकीपटूच्या रूपाने माझ्यासाठी ते महत्वाचे आहे. आता अश्विन (R Ashwin) भाई नाही पण मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहोत.

कुलदीपने 2018 मध्ये इंग्लंडमध्ये फक्त एक कसोटी खेळली आहे, जिथे त्याने त्याच्या 9 षटकात गोलंदाजी करताना एकही विकेट घेतली नाही. कुलदीप यादवने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये फक्त 2 सामने खेळले आहेत. पण आता कुलदीप यादवला एक्स फॅक्टर म्हणून बघितले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कचं ( Michael Clarke) देखील म्हणणं आहे की, कुलदीप यादव इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेत भारतासाठी गेम चेंजर ठरू शकतो. भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जून पासून सुरू होणार आहे.

Comments are closed.