'आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो, तरीही….’ भारत-पाकिस्तान सामन्यावर वसीम अकरम यांचे मोठे विधान

आशिया कप 2025 मध्ये 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अजूनही काही भारतीय चाहत्यांमध्ये नाराजी आहे. भारतीय क्रिकेटपटूंचंही मत आहे की आपल्याला पाकिस्तानविरुद्ध अजिबात खेळायला नको. तरीसुद्धा आशिया कप 2025 मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना होणारच आहे. आणि आता या महामुकाबल्यावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अकरम याचं मोठं विधान समोर आले आहे.

वसीम अकरम यांनी स्टिक विथ क्रिकेट पॉडकास्टवर भारत-पाकिस्तान सामन्याबाबत बोलताना म्हटलं की,
“आशिया कपचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत, पण आम्ही पाकिस्तानमध्ये शांत आहोत. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो, काही हरकत नाही, पण खेळ सुरू राहायला हवा. मी भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टेस्ट मालिकेची अपेक्षा करतो.”

पुढे अकरम म्हणाले,
“मी राजकारणापासून वेगळा आहे, मी कुठलाही राजकारणी नाही. ते त्यांच्या देशासाठी देशभक्त आहेत आणि आम्ही आमच्या देशासाठी. कुणीही मर्यादेपलीकडे बोलायला नको, फक्त आपल्या देशाच्या उपलब्ध्यांबद्दल बोलायला पाहिजे. ही गोष्ट भारत आणि पाकिस्तान दोघांनाही लागू होते. पण सांगणे सोपे आहे, प्रत्यक्षात अमलात आणणे मात्र कठीण.”

9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 ला सुरुवात होणार आहे आणि टीम इंडिया आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. टीम इंडियाला ग्रुप ‘अ’ मध्ये पाकिस्तान, ओमान आणि यूएईसोबत ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होत आहेत, ज्यांना 4-4 अशा दोन गटांमध्ये विभागले आहे. आशिया कप 2025 चे सामने दुबई आणि अबू धाबी येथे खेळले जाणार आहेत. यापैकी 11 सामने दुबईत तर 8 सामने अबू धाबीमध्ये पार पडतील.

Comments are closed.