Health Tips : तळणीचे तेल पुन्हा पुन्हा वापरताय? आधी हे वाचा

पावसाळ्यात गरमागरम, चटपटीत खाण्याची इच्छा होते. त्यामुळे घरात हमखास तळलेले पदार्थ बनवले जातात. तळलेले पदार्थ बनवायचे म्हणजे तेल वापरणे आलेच. पदार्थ बनवून झाले की, उरलेले तळणीचे वाया जाऊ नये म्हणून पुन्हा वापरले जाते. हे तेल पोळी बनवण्यासाठी, भाज्या परतण्यासाठी वापरले जाते. पण, तुम्हाला हे माहिती आहे का? की, पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा वापरल्यास आरोग्यासाठी हानिकराक ठरू शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तळणीचे तेल गरम केल्यास शरीरात फ्री रॅडिकल्स वाढू लागतात. ज्यामुळे शरीरावर सूज येऊ शकते आणि शरीराच्या अनेक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे आज आपण जाणून घेऊयात, तळणीचे तेल पुन्हा वापरल्यास आरोग्यावर काय परिणाम होतो.

आरोग्यावर होणारे परिणाम –

  • तळणीच्या तेलात ट्रान्स फॅट असतात, हे फॅट शरीरासाठी हानिकारक असतात. हे खाल्ल्याने शरीरातील चांगले कोलेस्टेरॉल कमी होते आणि वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढू लागते. शरीरात वाईट कोलेस्टेरॉल वाढल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो.
  • वापरलेले तेल अल्डेहाईटसारखे विष बाहेर टाकते. हे विष शरीरासाठी घातक असून हृदयाच्या आरोग्यासाठी असते. यामुळे अल्झायमर, स्ट्रोक, कर्करोग, पार्किस्ननसारख्या समस्या उद्भवतात.
  • जर तुम्हाला वारंवार गॅसची समस्या उद्भवत असेल तर या समस्येला तळणीचे तेल वापरणे कारण असू शकते. स्ट्रीट फूडवर मिळणारे पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले तेल वापरले जाते. त्यामुळे तज्ज्ञमंडळी कायम आपल्याला बाहेरचे पदार्थ अन्नपदार्थ न खाण्याचा सल्ला देतात.
  • जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तळणीचे पदार्थ खाऊ नयेत. तळणीच्या तेलामुळे आरोग्याच्या समस्या आणखी वाढू शकतात. यामुळे खराब कोलेस्टेरॉल वाढते आणि हृदयाशी संबंधित समस्या सुरू होतात.

तळणीच्या तेलाचा असा करा वापर –

  • तुम्ही तळणीच्या तेलाने घराचे दरवाजे आणि कुलूप गंजण्यापासून वाचवू शकता.
  • याशिवाय तळणीचे तेल व्हिनेगरला उत्तम ऑप्शन आहे. तुम्ही या तेलाने लाकडी फर्निचर पॉलिश करू शकता. यामुळे तुमचे पैसेही वाचतील.
  • सर्वात शेवटचं म्हणजे कोणताही पदार्थ तळताना लागेल तितकेच तेल घ्यावे. यामुळे तेल फेकण्याची वेळ येणार नाही आणि तेलाचा योग्य वापरही होऊ शकतो.

 

 

 

हेही पाहा –

Comments are closed.