Asia Cup: निवडकर्त्यांच्या 5 निर्णयांनी चाहत्यांना धक्का, या खेळाडूंना टीममध्ये पाहून फॅन्स भडकले!
आशिया कप 2025 (Asia Cup 2025) साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली आहे. निवडकर्त्यांनी सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कर्णधारपदाखाली एकूण 15 खेळाडूंची टीम जाहीर केली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas iyer) मात्र पुन्हा एकदा निवडकर्त्यांचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरला आहे. फक्त अय्यरला ड्रोप केलं असं नाही, तर निवडकर्त्यांचे काही निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे ठरले आहेत.
अय्यरला संधी न देता निवडकर्त्यांनी शुबमन गिलवर (Shubman gill) विश्वास दाखवला आहे आणि त्याला उपकर्णधार बनवलं आहे. गिलला अय्यरच्या पुढे प्राधान्य देण्यात आलं, यावर चाहते अजिबात खूश नाहीत. याशिवाय यशस्वी जयस्वालला स्टँडबायमध्ये ठेवण्याचा निर्णयही चाहत्यांना अजिबात पसंत पडलेला नाही.
मोहम्मद सिराजलाही (Mohmmed Siraj) टीममध्ये स्थान मिळालं नाही. तर वॉशिंग्टन सुंदरलाही (Washington Sundar) फक्त स्टँडबायमध्येच ठेवण्यात आलं आहे. सतत खराब फॉर्ममध्ये असूनही रिंकू सिंगला (Rinku Singh) मात्र टीममध्ये जागा देण्यात आली आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग
Comments are closed.