आशिया कपच्या इतिहासात कोणत्या संघाचे वर्चस्व? 'या' संघाने जिंकलीय सर्वाधिक वेळा ट्राॅफी
आशिया चषक विजेत्यांची यादी: आशिया कप 2025 ची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. ही आशिया कपची 17 वा हंगाम असेल. यावर्षीचा आशिया कप टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाईल. आशिया कपचे टी20 फॉरमॅटमध्ये आयोजन होण्याची ही फक्त तिसरीच वेळ असेल, याशिवाय बाकीचे 14 आशिया कप वनडे फॉरमॅटमध्ये खेळले गेले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा आशिया कपचे विजेतेपद भारताने जिंकले आहे. त्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो. (Asia Cup history)
आशिया कपची सुरुवात 1984 मध्ये झाली होती. त्यावेळी भारताने श्रीलंकेला हरवून पहिल्या आशिया कपचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. भारताने आतापर्यंत सर्वाधिक वेळा, म्हणजे एकूण 8 वेळा आशिया कपची ट्राॅफी जिंकली आहे. भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 मध्ये आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. (India Asia Cup record)
भारतानंतर श्रीलंका आशिया कपमधील सर्वात यशस्वी संघ राहिला आहे. श्रीलंकेने 6 वेळा आशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये आशिया कपचे विजेतेपद आपल्या नावावर केले होते. (Sri Lanka Asia Cup record)
आशिया कपच्या इतिहासात पाकिस्तानला फक्त दोनदाच विजेतेपद जिंकता आले आहे. पाकिस्तानने पहिल्यांदा 2000 मध्ये आशिया कपची ट्राॅफी जिंकली होती. त्यानंतर त्यांना 12 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. पाकिस्तानने पुन्हा 2012 मध्ये आशिया कप जिंकला. (Pakistan Asia Cup wins)
आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे वर्चस्व राहिले आहे. या तिन्ही संघांव्यतिरिक्त इतर कोणताही संघ आतापर्यंत आशिया कपची ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. बांगलादेश आणि अफगाणिस्तानला आशिया कपची ट्रॉफी जिंकण्याची दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे. (Bangladesh Afghanistan Asia Cup) याशिवाय, जे नवीन संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत, त्यांनाही आशिया कपची ट्राॅफी जिंकण्यात अपयश आले आहे.
Comments are closed.