उर्वरित आयपीएल हंगामासाठी सर्व संघांचे परदेशी खेळाडू उपलब्ध असणार की नाही? वाचा सविस्तर

यंदाच्या आयपीएलचा (Indian Premier League) उर्वरित हंगाम (17 मे) पासून सुरू होणार आहे. भारत-पाकिस्तान सीमा तणावामुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. त्याचवेळी सर्व परदेशी खेळाडू आपल्या देशात परतले होते. पण आता उर्वरित आयपीएल हंगाम सुरू झाल्यानंतर सर्व 10 संघाचे परदेशी खेळाडू सामन्यासाठी उपलबद्ध असतील की नाही? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.

चेन्नई सुपर किंग्ज- या संघात उर्वरीत आयपीएलमध्ये जॅमी ओव्हरटनसोडून सर्व परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत.

दिल्ली कॅपिटल्स- मिचेल स्टार्क आणि जॅक फ्रेजर मॅकगर्क कदाचीत उर्वरीत आयपीएलसाठी परतरणार नाहीत. ट्रिस्टन स्टब्स प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसेल.

गुजरात टायटन्स- जोस बटलर आणि कागिसो रबाडा प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसतील.

कोलकाता नाईट रायडर्स- सर्व परदेशी खेळाडू उर्वरीत आयपीएलसाठी उपलब्ध असतील.

लखनऊ सुपर जायंट्स- एडन मारक्रम प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

मुंबई भारतीय- विल जॅक, कोर्बिन बॉश आणि रायन रिकेल्टन प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

पंजाब किंग्ज- मार्को जेन्सेन प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्स- सर्व परदेशी खेळाडू उर्वरीत आयपीएल हंगामासाठी उपलब्ध असतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- जेकब बेथेल आणि लुंगी एनगिडी प्ले-ऑफसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. तर जोश हेडलवुड परतण्याची शक्यता कमी आहे.

सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स आणि ट्रॅविस हेड लवकर स्कॉडबरोबर दिसतील. उर्वरित आयपीएल खेळतील.

Comments are closed.