While criticizing the Modi government, the Thackeray group praised Dr. Manmohan Singh msj
सत्तेवर नसताना नरेंद्र मोदी यांना रुपयाच्या घसरणीची चिंता वाटत होती तेव्हा रुपया जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ‘60’ होता आणि आज मोदी काळात ‘87’ इतका घसरला आहे. देश कोसळत असल्याचे हे संकेत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
(Indian Economy) मुंबई : रुपयावर सगळ्याचा प्रभाव पडतो आणि तो घसरतो. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम रुपयावर होतो, हा दावा खरा नाही. तेलाच्या किमती स्थिर झाल्या तरीही रुपयाचे मूल्य वाढले नाही. रुपया कमजोर झाल्यामुळे ‘आयात’ महाग झाली. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था दुरुस्त करणारा योद्धा निर्माण झाला नाही, असे सांगत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. (While criticizing the Modi government, the Thackeray group praised Dr. Manmohan Singh)
रुपया घसरून पडण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे. भारतातील विदेशी गुंतवणूक थांबली आहे आणि ज्यांनी ही गुंतवणूक केली, त्यांनी ती मागे घेऊन पुन्हा अमेरिकेची तिजोरी भरण्याचा उपक्रम सुरू केला आहे. रुपया असाच पडत राहिला तर भारतीय उद्योजकांना परदेशी चलन मिळवणे कठीण जाईल. ज्यांची मुले परदेशात शिकत आहेत, त्यांचे बजेट उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्यार्थ्यांना भारतातून जास्त रक्कम पाठवावी लागेल, असा इशारा सामना या मुखपत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोदी सरकारला दिला आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Indian Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेचे डबके झाले आहे, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर घणाघात
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत अत्यंत तकलादू लोक अर्थमंत्रीपदावर विराजमान केले. त्यांनी अर्थव्यवस्थेचा साफ खेळखंडोबा केला. मोदींनी जबरदस्तीने लादलेल्या नोटाबंदीने भारतीय अर्थव्यवस्थेचे जगात हसे झाले आणि रुपयाला कायमची घरघर लागली. भारतीय चलनात आजही मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा ओघ आहे आणि काळा पैसा मोठ्या प्रमाणात परदेशी बँकांत आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.
– Advertisement –
सत्तेवर नसताना नरेंद्र मोदी यांना रुपयाच्या घसरणीची चिंता वाटत होती तेव्हा रुपया जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ‘60’ होता आणि आज मोदी काळात ‘87’ इतका घसरला आहे. देश कोसळत असल्याचे हे संकेत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे त्यांचे परदेश दौरे सुरूच ठेवतील, पण सामान्य भारतीयांचे हाल वाढतील. रुपयाचे अवमूल्यन चिंताजनक आहे. 2013मध्ये रुपयाच्या घसरण्यावरून ‘टिव टिव’ करणाऱ्या आणि ‘डॉलर’ अंडरवेअरचे उदाहरण देत तत्कालीन काँग्रेस सरकारवर टीका करणाऱ्या जुही चावलास कोणीतरी हे सांगायला हवे. ‘डॉलर’ अंडरवेअरचे उत्पादन बंद झाले काय, हे जुही चावलाने स्पष्ट करावे, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे. (Indian Economy : While criticizing the Modi government, the Thackeray group praised Dr. Manmohan Singh)
हेही वाचा – Depreciation of Rupee : अक्षय कुमार, जुही चावला, अनुपम खेर हे मोदींचे अंधभक्त, ठाकरे गटाचा निशाणा
Comments are closed.