कुलदीप यादवने पाकिस्तानच्या फलंदाजांची उडवली थट्टा, जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?
कुलदीप यादवची (Kuldeep yadav) जादू आशिया कप 2025 (Asia Cup Final) मध्ये शानदार पद्धतीने पहायला मिळाली. चाइनामॅन (स्पिन) गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत सर्वच फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. कुलदीपने 7 सामने खेळत एकूण 17 विकेट घेतल्या. विशेषतः पाकिस्तानच्या फलंदाजांसाठी त्याचं संघात असणं मोठं त्रासदायक ठरलं. फायनल सामन्यात त्याने पाकिस्तानच्या फलंदाजी ऑर्डरला बुडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
फायनलमध्ये सामन्यात त्याने फक्त 30 धावा खर्च करून 4 विकेट घेतल्या. दरम्यान, कुलदीपच्या प्रशिक्षकांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या फलंदाजांचा अंदाज पाहून भारतीय स्पिनरच्या चेहऱ्यावर हसू थांबायचं कामच नव्हतं. कुलदीपने म्हटलं की, पाकिस्तानने या आशिया कपसाठी ‘मुले’ पाठवली आहेत.
कुलदीप यादवचे प्रशिक्षक कपिल देव पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना सांगितलं, कुलदीपला पाकिस्तान दिसताच उत्साह उफाळतो. पाकिस्तानने यंदा अनुभव नसलेली आणि नवीन टीम पाठवली होती. कुलदीप मानसिकदृष्ट्या पाकिस्तानविरुद्ध नेहमीच आक्रमक राहतो. ह्या वेळी त्याचं हसू थांबतच नव्हतं. त्याने मला सांगितलं की, पाकिस्तानने फक्त खेळण्यासाठी मुले पाठवली आहेत. जर बाबर आजम आणि मोहम्मद रिजवान असते, तर सामना थोडासा वेगळा झाला असता.
प्रशिक्षकांनी सांगितलं की, त्यांनी कुलदीपला मैदानावर शांत राहण्याचा सल्ला दिला होता, आम्ही नेहमी पाकिस्तानविरुद्ध मैदानावर शांत राहण्याची रणनीती वापरतो. त्यांचा पॅटर्न लक्षात ठेवतो आणि प्रेशर घेत नाही. मी कुलदीपला सांगितलं की जर कोणी तुला उकसवण्याचा प्रयत्न करेल, तर उत्तर देऊ नकोस आणि फोकस कायम ठेव. कुलदीपने तसंच केलं.
आशिया कपपूर्वी त्याने ‘बिग ब्रेक बॉल’ची प्रॅक्टिस केली होती. हा बॉल 2019 मध्ये बाबर आजमविरुद्ध यशस्वी ठरला होता. त्याने हाच बॉल श्रीलंकेविरुद्धही वापरला. पाकिस्तानने आपला सर्वात मोठा ट्रंप कार्ड शादाब खान सामील केला नव्हता, जो सध्या संघातील सर्वात धोकादायक स्पिनर आणि फलंदाज आहे. कुलदीप म्हणाला की पाकिस्तानने फक्त ‘शाळेतील मुले’ पाठवली आहेत.
Comments are closed.