Rice: ब्राउन की व्हाइट? कोणता तांदूळ आरोग्यासाठी उत्तम
भारतीयांच्या ताटातील एक प्रमुख पदार्थ भात आहे. भाताशिवाय भारतीयांचे जेवण अपूर्ण मानले जाते. काहींना तर दुपारच्या जेवणातही भात खायला आवडतो. भात हा असा पदार्थ आहे की, जो कमी वेळात तयार होतो शिवाय बनवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत नाही. सामान्यपणे, आपल्या देशात पांढऱ्या तांदळाचा भात खाल्ला जातो. पांढऱ्या तांदळाचा भात सहजपणे पचतो. पण, हल्ली ब्राउन राइसची क्रेझ अधिक दिसून येते. अनेकजण व्हाइट राइसऐवजी ब्राऊन राइस खाण्याला प्राधान्य देतात. पण, उत्तम आरोग्यासाठी सर्वाधिक योग्य तांदूळ कोणता? ब्राउन की व्हाइट?
तपकिरी तांदूळ
- तपकिरी तांदूळ अर्थात ब्राउन राइस हा एक पूर्ण धान्य आहे. याची चवही खास असते.
- या तांदळात कार्बोहायड्रेट्स, फायबर, प्रोटीन आणि फॅट्स असतात.
- व्हाइट राइसच्या तुलनेत ब्राउन राइस लवकर पचतो.
- ब्राउन राइसचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते. डायबिटीस असलेल्या व्यक्तींसाठी हा तांदूळ वरदान मानला जातो.
- ब्राउन राइसमध्ये असलेल्या फायबर, ऍटी-ऑक्सिडंटमुळे हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
- ब्राउन राइसच्या सेवनाने शरीरातील जळजळ कमी होते.
- भात आवडत असेल आणि वजन कमी करायचे असल्यास ब्राउन राइस एक उत्तम पर्याय आहे.
पांढरा तांदूळ –

- व्हाइट राइस शरीराला अधिक उर्जावान बनवतो. त्यामुळे आजारी व्यक्तीला आवर्जून हा भात खायला दिला जातो.
- व्हाइट राइसमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर आढळतात.
- ब्राउन राइसच्या तुलनेत व्हाइट राइस लवकर शिजतो.
- व्हाइट राइस पचायला हलका असतो.
कोणता तांदूळ योग्य ?
व्हाइट की ब्राऊन राइस आरोग्यासाठी फायदेशीर हे समजण्यासाठी त्यातील पोषक घटकांची माहिती घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही वेट लॉसच्या करण्याच्या प्रयत्नात असाल तर ब्राउन राइस तुम्ही खायला हवा. जर तुम्ही आजारी असाल तर मात्र सहज पचणारा हलका व्हाइट राइस तुम्ही खायला हवा.
हेही पाहा –
Comments are closed.