टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू खेळलेले फलंदाज कोण?जाणून घ्या 'हे' टॉप 5 नावे

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटपैकी कसोटी हा जास्त अवघड मानला जातो. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांचा संयम, तंत्र आणि मानसिक कणखरता याची खरी परीक्षा असते. या फॉरमॅटमध्ये जास्त काळ टिकून राहणे हे अनेक वेळा विजयाची गुरुकिल्ली बनते. हे काम कसोटी क्रिकेटमधील अनेक दिग्गज फलंदाजांनी केले आहे, ज्यांनी केवळ धावा केल्या नाहीत तर हजारो चेंडूंचा सामना केला आहे आणि त्यांच्या संघासाठी भिंतीप्रमाणे क्रिजवर उभे राहिले आहेत.

द्रविडने त्याच्या 164 कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत 31,258 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात द्रविडने 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. द्रविडने कसोटी कारकिर्दीत 63 अर्धशतके आणि 36 शतके केली आहेत.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर सचिन आहे ज्याला क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाते. सचिनने त्याच्या 200 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 29437 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याने 53.78 च्या सरासरीने 15,921 धावा केल्या आहेत. सचिनने कसोटीत 68 अर्धशतके आणि 51 शतके केली आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅलिसने 166 कसोटी सामन्यांमध्ये 28,903 चेंडू टाकले आहेत. कॅलिसने कसोटीत 13,289 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 58 अर्धशतके आणि 45 शतके केली आहेत.

या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल चौथ्या क्रमांकावर आहे. चंद्रपॉलने 164 कसोटी सामन्यांमध्ये 27,395 चेंडूंचा सामना केला आहे. या काळात त्याने 11,867 धावा केल्या आहेत. चंद्रपॉलने कसोटीत 66 अर्धशतके आणि 30 शतके केली आहेत.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज एलन बॉर्डर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा गोलंदाजांच्या यादीत पाचवा आहे. बॉर्डरने 156 कसोटी सामन्यांमध्ये 27,002 चेंडू खेळले आहेत. बॉर्डरने 10,927 धावा केल्या आहेत. या काळात बॉर्डरने 63 अर्धशतके आणि 27 शतके केली आहेत.

Comments are closed.