CSKमध्ये येताच संजू सॅमसनला मोठा धक्का? धोनीच्या खास खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी!
गेल्या 4 हंगामांपासून राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व सांभाळणारा संजू सॅमसन (Sanju Samson) आता ट्रेडद्वारे 5 वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघात दाखल झाला आहे.
चेन्नई आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांच्याबद्दल बातम्या येताच, तो महेंद्रसिंह धोनीचा रिप्लेसमेंट म्हणून संघात येत असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे त्याला फ्रेंचायझीचा नवा कर्णधार बनवले जाईल, अशा चर्चा सुरू होत्या. पण संजू सॅमसन CSKमध्ये सामिल झाल्यानंतर, फ्रेंचायझीनं त्याच्याशी काहीतरी ‘धोका’ केला का, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला.
15 नोव्हेंबरला चेन्नईनं इतर सर्व फ्रेंचायझीसह आपली रिटेन आणि रिलीज लिस्ट जाहीर केली. यात संजू सॅमसनचा नावही होतं. याचबरोबर CSKनं मोठ्या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकलं. याचा अर्थ असा की, संजू सॅमसन फक्त खेळाडू म्हणूनच संघात उतरणार आहे.
राजस्थानचं नेतृत्व सोडून आलेल्या संजूला, चेन्नईनं केवळ प्लेयर म्हणूनच आपल्या संघात घेतलं आहे.
Comments are closed.