झिम्बाब्वेचे अँडी पाइक्रॉफ्ट नेमके कोण आहेत? ज्यामुळे पाकिस्तानच्या टीमने स्पर्धेचा केला बहिष्कार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 मधील सामन्यादरम्यान सामन्याचे रेफरी अँडी पाइक्रॉफ्ट होते. टॉस दरम्यान सूर्यकुमार यादव आणि सलमान अली आगा यांनी हँडशेक केला नाही. भारताने सामना 7 विकेटने जिंकल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी केली नाही. यासाठी पीसीबी अँडी पाइक्रॉफ्टला जबाबदार धरत आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानची टीम यूएईविरुद्धच्या सामन्याचा बहिष्कार करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.
जिम्बाब्वेसाठी अँडीने 3 टेस्ट सामने आणि 20 वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्यांनी एकूण 447 धावा केल्या आहेत. पाइक्रॉफ्ट 1983 साली जिम्बाब्वेच्या टीमचा भाग होते. पायक्रॉफ्ट 2009 पासून आयसीसीच्या एलीट पॅनेलचा सदस्य आहेत. त्यानंतर अँडी पायक्रॉफ्टने 103 टेस्ट, 248 वनडे आणि 183 टी20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये आयसीसी अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच ते आयसीसीचे सर्वात दिग्गज मॅच ऑफिसियल्सपैकी एक मानले जातात. या कारणामुळेच त्यांना एसीसी आशिया कप 2025 साठी मॅच रेफरी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पाकिस्तानसोबत त्यांचा संबंध पूर्वीपासून चांगला नव्हता, ज्यामुळे हा वाद आणखी मोठा झाला.
Comments are closed.