भारत-पाकिस्तान टी20 सामन्यांमध्ये 'हा' खेळाडू आहे धावांचा बादशाह…! सर्वाधिक धावा त्याच्याच नावावर

भारत वि पाकिस्तान: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आणखी एका महासामन्याची तयारी सुरू झाली आहे. आशिया चषकाची सुरुवात पुढील महिन्यात होणार आहे. जरी पहिला सामना 9 सप्टेंबरला होणार असला, तरी सर्वांचे लक्ष 14 सप्टेंबरच्या सामन्यावर असेल, ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने असतील. (Asia Cup 2025 India Pakistan match) यंदाचा आशिया चषक टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, जेव्हाही भारत आणि पाकिस्तानचे संघ टी20 फॉरमॅटमध्ये आमनेसामने आले आहेत, तेव्हा सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत. (India vs Pakistan T20 records)

भारत विरुद्ध पाकिस्तान टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज भारतीय संघाचा विराट कोहली आहे. तो इतर फलंदाजांपेक्षा इतका पुढे आहे की त्याला मागे टाकणे सध्या तरी शक्य वाटत नाहीये. विराट कोहलीने 2012 पासून 2024 पर्यंत पाकिस्तानविरुद्ध 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 492 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर पाकिस्तानविरुद्ध 5 अर्धशतके आहेत. विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध 70.28च्या सरासरीने आणि 123.92च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. (Virat Kohli vs Pakistan stats)

विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. त्याने भारतासमोर आतापर्यंत 5 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळून 228 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या नावावर 2 अर्धशतके आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचाच शोएब मलिक आहे, ज्याने भारतासमोर 9 सामने खेळून 164 धावा केल्या आहेत. त्यानंतर मोहम्मद हफीजचा नंबर लागतो, ज्याने भारतासमोर 8 टी20 सामने खेळून 156 धावा केल्या आहेत. (Highest run scorer IND vs PAK T20)

मोहम्मद रिझवान आणि इतर फलंदाजांपेक्षा कोहली किती पुढे आहे, वरील आकडेवारीवरून समजतच आहे. कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली आणि तो यावेळी आशिया कपमध्ये खेळत नसला तरी, दुसरा कोणताही फलंदाज त्याला मागे टाकू शकेल असे वाटत नाही. कोहलीच्या सर्वात जवळ मोहम्मद रिझवान आहे, पण त्याला आशिया चषकासाठी पाकिस्तानच्या क्रिकेट संघात स्थान देण्यात आलेलं नाही. (Kohli T20 record against Pakistan)

Comments are closed.