आशिया कपमध्ये एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स कोणाच्या नावावर? टॉप-5 मध्ये किती भारतीय गोलंदाज?
आशिया कप सामन्यात सर्वाधिक विकेट: आशिया कपच्या एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. 2008 मध्ये भारताच्या विरुद्ध मेंडिसने आशिया कपच्या इतिहासातील सर्वात प्रभावी गोलंदाजी केली होती. 17 वर्षांपासून मेंडिसचा हा विक्रम कोणीही मोडू शकलेला नाही. या यादीत पहिल्या 5 मध्ये एकूण तीन भारतीय गोलंदाजांचा समावेश आहे. (Best bowling figures in Asia Cup history)
आशिया कपच्या एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 गोलंदाज
1) अजांथा मेंडिस- श्रीलंकेचा दिग्गज फिरकी गोलंदाज अजंथा मेंडिसने 2008 मध्ये भारताच्या विरुद्ध आशिया कपमध्ये सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. मेंडिसने फक्त 13 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या होत्या. 17 वर्षांनंतरही मेंडिसचा हा रेकाॅर्ड आजही कायम आहे. (Ajantha Mendis record Asia Cup)
२) मोहम्मद सिराज- भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 2023 मध्ये सिराज मेंडिसचा रेकाॅर्ड मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. श्रीलंकेविरुद्ध त्याने 6 विकेट्स घेतल्या, परंतु त्याने 21 धावा दिल्या होत्या. (Mohammad Siraj Asia Cup 2023 spell)
)) भुवनेश्वर कुमार- भारतीय वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. भुवीने 2022 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टी20 आशिया कपमध्ये 4 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. टी20 आशिया कपमधील ही सर्वात उत्कृष्ट गोलंदाजी आहे. (Bhuvneshwar Kumar T20 Asia Cup record)
)) अकिब जावेद- पाकिस्तानचा माजी गोलंदाज आकिब जावेद या यादीत चौथ्या स्थानावर आहे. जावेदने 1995 मध्ये भारताविरुद्ध 19 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या. 13 वर्षांनंतर मेंडिसने त्याचा रेकाॅर्ड मोडला होता. (Aaqib Javed best bowling vs India)
5) अर्शद अयूब- माजी भारतीय गोलंदाज अर्शद अयूब या यादीत पाचव्या स्थानावर आहे. 1989 मध्ये अयूबने पाकिस्तानविरुद्ध 21 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या होत्या आणि इतिहास रचला होता. (Arshad Ayub Asia Cup wickets)
Comments are closed.