इंग्लंडमध्ये महिलेवर अत्याचार, पोलिसांनी थेट मैदानातून उचलला, क्रिकेटला कलंक लावणारा ‘तो’ पाकिस
पाकिस्तान क्रिकेटर हैदर अली: पाकिस्तान क्रिकेट आणि वाद यांचं नातं अगदी जुने आहे. आता पाकचा आणखी एक खेळाडू बदनामीच्या दलदलीत अडकला आहे. हा खेळाडू म्हणजे तरुण क्रिकेटपटू हैदर अली. ब्रिटनच्या पोलिसांनी त्याला कथित बलात्काराच्या आरोपावरून अटक केली आहे. अवघ्या 24 व्या वर्षी पाकिस्तानचा हा उदयोन्मुख फलंदाज अशा आरोपाला सामोरा जात आहे, जो तपासानंतर खरा ठरला तर त्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका गुन्हेगारी तपासाच्या पार्श्वभूमीवर हैदर अलीला तात्पुरतं निलंबित केलं आहे. ग्रेटर मँचेस्टर पोलिस 23 जुलै रोजी पाकिस्तान ‘शाहिन’च्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान मँचेस्टरमध्ये लागलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत. 3 ऑगस्टला एका सामन्यादरम्यान हैदर अलीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं, मात्र त्याचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.
🚨 ब्रेकिंग: पाकिस्तानी क्रिकेटपटू हैदर अली यांना एका अल्पवयीन ख्रिश्चन मुलीसाठी आर.
पश्चिमेकडे पी*डोफिल पंथ परवानगी देऊ नये. 😡 pic.twitter.com/dyouaobwe7
– रेजिंग वेस्ट (@रेजिंगवेस्ट) 9 ऑगस्ट, 2025
हैदर अली कोण आहे?
2 ऑक्टोबर 2000 रोजी पंजाब प्रांतातील अटक शहरात जन्मलेल्या हैदर अलीला पाकिस्तानचा उजव्या हाताचा आश्वासक फलंदाज मानलं जातं. कधीकाळी त्याला पाकिस्तानचा पुढचा बाबर आझम म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. 2020 मध्ये मँचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं, तर त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये झिंबाब्वेविरुद्ध वनडे डेब्यू झाला. 35 टी-20 सामन्यांत त्याने 17.41 च्या सरासरीने आणि 124.69 च्या स्ट्राइक रेटने 505 धावा केल्या असून त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये त्याचा अनुभव केवळ दोन सामन्यांचा असून त्यात त्याने 21 च्या सरासरीने 42 धावा केल्या आहेत.
हैदर अली 2020 आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा उप-कर्णधार होता. पाच सामन्यांत त्याने 26.75 च्या सरासरीने 107 धावा केल्या होत्या, ज्यात 56 धावांची सर्वोच्च खेळी सामावलेली आहे.
PCB कडून कारवाई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हैदर अलीला तात्काळ निलंबित करत ब्रिटनच्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन करत त्याला कायदेशीर मदत पुरवण्याची घोषणा केली आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर आणि वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असं बोर्डानं स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा –
संजू सॅमसन: ना राजस्थान, ना चेन्नई, संजू संजू सॅमसा इपेल तिसर्या तृतीयांश, भव्यपणे
आणखी वाचा
Comments are closed.