एअरपोर्टवर गर्लफ्रेंडला हात पकडायचा होता, पण कॅमेऱ्यांना पाहून हार्दिकने काय केलं? Video Viral


हार्दिक पंडाया- महीका शर्मा न्यूज: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. आशिया कप 2025 सुरू होण्यापूर्वी त्याने केसांना दिलेल्या रंगांमुळे तो चर्चेत आला होता. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या फायनलपूर्वी तो दुखापतग्रस्त झाला आणि त्यामुळे त्याला संघातून बाहेर व्हावं लागलं. दरम्यान, सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. असं म्हटलं जातंय की, त्या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्याची ती गर्लफ्रेंड आहे.

हार्दिक पांड्याने आधी नताशा स्टँकोविकशी लग्न केलं होतं, मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याचं नाव जॅसमिन वालिया सोबत जोडले गेले, पण काही दिवसांतच दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या. आता काही दिवसांपासून लोक हार्दिकचं नाव 24 वर्षांच्या दिल्लीतील मॉडेल आणि अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत जोडत आहेत.


अलीकडेच हार्दिक आणि माहिका दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. दोघेही कॅज्युअल लुकमध्ये दिसत होते. एअरपोर्टवर गर्लफ्रेंडला हार्दिकचा हात पकडायचा होता, पण कॅमेऱ्यांना पाहून पांड्या तिला पुढे घेतो. मात्र, चाहत्यांना ही जोडी फारशी आवडली दिसत नाही आणि ते सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोल करत आहेत.

कोण आहे माहिका शर्मा? (Who is Hardik Pandya rumoured girlfriend Mahieka Sharma)

24 वर्षांची माहिका शर्मा ही एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. हार्दिक आणि माहिका दोघेही बराच काळ एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत आहेत. आता दोघे एकत्र दिसल्यानंतर लोकांना त्यांचा रिलेशनशिप मध्ये असल्याचा विश्वास वाटतोय. मात्र, दोघांनीही अद्याप या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. विमानतळावर माहिका ब्लॅक रंगाच्या पफी जॅकेटमध्ये दिसली. जॅकेटला टोपी जोडलेली होती आणि फिटेड ट्राउझरमुळे तिचा लुक अधिक आकर्षक दिसत होता.

हे ही वाचा –

Team India Womens World Cup : दोन विजय, एक पराभव अन् खात्यात फक्त चार गुण, टीम इंडिया सेमी फायनलमध्ये कशी पोहोचणार? टेन्शन वाढलं, जाणून घ्या पुढील सामने कोणाशी?

आणखी वाचा

Comments are closed.