विराटला क्लीन बोल्ड करणारा हिमांशू सागवान आहे तरी कोण? पाहा आकडेवारी

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. त्याने शेवटचा रणजी सामना 12 वर्षांपूर्वी खेळला होता. तेव्हापासून आता खूप काही बदलले आहे. आज रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्धचा सामना खेळण्यासाठी विराट मैदानावर आला, तेव्हा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या संख्येने स्टेडियममध्ये गर्दी केली होती. खराब फॉर्ममुळे झगडत असलेला विराट कोहली या सामन्यातही काही खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त 6 धावा करून बाद झाला. या सामन्यात विराट कोहलीला हिमांशू सांगवानने बाद केले. विराट कोहली हिमांशूचा चेंडू खेळू शकला नाही परिणामी तो क्लीन बोल्ड झाला

विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळणे ही एक मोठी गोष्ट बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट जगतात हा मुद्दा चर्चेचा विषय आहे. आज 31 जानेवारी रोजी जेव्हा विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा संपूर्ण स्टेडियम विराट-विराटच्या आवाजाने दुमदुमून गेला. सर्वांना त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित होती. पण कोहलीने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांना निराश केले. हिमांशू सांगवानने विराट कोहलीला बाद करून त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात मोठी विकेट घेतली. अशा परिस्थितीत, हा गोलंदाज कोण आहे ते जाणून घेऊया.

दिल्ली विरुद्ध रेल्वेकडून खेळणाऱ्या हिमांशू सांगवानचा जन्म दिल्लीतील नजफगड येथे झाला. तो 29 वर्षांचा आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत चेंडूने चांगली कामगिरी केली आहे. हिमांशू सांगवानने त्याच्या कारकिर्दीत एकूण 23 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 77 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 9 डिसेंबर 2019 रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने रेल्वेसंघाकडूनच पदार्पण केले. लिस्ट ए मध्ये त्याने 17 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. तो दिल्लीच्या 19 वर्षांखालील संघाकडूनही खेळला आहे. हिमांशूने रणजी ट्रॉफीच्या या हंगामात आतापर्यंत एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत.

हिमांशू सांगवानला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठे विकेट घेण्याची सवय झाली आहे. त्याच्या कारकिर्दीत, हिमांशू सांगवानने त्याच्या पदार्पणाच्या हंगामातच अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ सारख्या फलंदाजांना बाद करून तो कोणत्या स्तरावरचा गोलंदाज आहे हे सिद्ध केले. हिमांशू सांगवानने ग्लेन मॅकग्राच्या एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्या जादूची झलक दाखवत आहे.

क्रिकेटमध्ये घराघरात लोकप्रिय होण्यापूर्वी हिमांशू सांगवान नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिकीट कलेक्टर म्हणून काम करत होता. हिमांशूची आई भगवान रती व्यवसायाने शाळेत शिक्षिका आहे आणि वडील सुरेंद्र सिंग सांगवान एका बँकेत व्यवस्थापक म्हणून काम करतात. खरंतर, त्याला एका मित्राद्वारे रेल्वेतील नोकरीबद्दल कळाले. अर्ज केल्यानंतर 6 महिन्यांतच त्याला तिकीट कलेक्टरची नोकरी मिळाली.

हेही वाचा-

चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी संघाला मोठा धक्का, अष्टपैलू खेळाडू स्पर्धेतून बाहेर.!
चाहत्यांच्या अपेक्षांवर पुन्हा पाणी, विराट कोहलीकडून डोमेस्टिक क्रिकेटमध्येही धावा निघेना…!
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, या संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद

Comments are closed.