आशिया चषकावेळी सतत विष ओकणाऱ्या पोस्ट; भारताने फायनल जिंकताच ट्रॉफी घेऊन पळालेला पाकिस्तानचा मं
कोण मोहसिन नकवी इंड. वि पाक अंतिम आशिया कप 2025 आहे: आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India beat Pakistan Asia Cup 2025) शानदार विजय मिळवल्यानंतर ट्रॉफी वितरण समारंभात असे काही घडले, जे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधी झाले नसेल. दुबई येथे रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्यांचे सहकारी खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषद (ACC) चे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर नक्वी यांनी ती ट्रॉफी स्वतःसोबत नेली. भारतीय संघाने मग ट्रॉफी न उचलताच जल्लोष साजरा केला.
भारतीय संघाने ट्रॉफी का घेतली नाही? (Why didnt team india take Asia Cup trophy?)
नक्वी यांच्या या कृतीने फक्त क्रिकेट विश्वातच नव्हे, तर राजकीय वर्तुळातही खळबळ उडवली. बीसीसीआयने जाहीर केले आहे की येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत ते नक्वी यांच्या या वागणुकीविरोधात निषेध नोंदवणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, सामन्यानंतर भारतीय खेळाडूंना सांगण्यात आले की पाकिस्तानचे गृहमंत्री व पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून त्यांना ट्रॉफी दिली जाईल. त्यावर भारतीय संघाने स्पष्ट नकार दिला. खेळाडूंचे म्हणणे होते की, ते ट्रॉफी इतर कोणत्याही अधिकाऱ्याकडून स्वीकारतील, पण नक्वींकडून नाही, कारण ते नेहमीच भारतविरोधी विधानं करत आले आहेत.
भारताला पराभूत झाल्यानंतर मोहसीन नकवी दुबईच्या मैदानापासून कसे पळत आहे 😂🤮#Indvspak #ASIACUPFINAL#MOHSINNAQVI #ट्रॉफी#INDVSPAK2025 #क्रिकेट#ऑपरेशन्सइंडूर
pic.twitter.com/nyyd9gggy– विश्वजित ठाकूर (@थाकुरविश 80259) 28 सप्टेंबर, 2025
ट्रॉफी विवादानंतर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया काय म्हणाले? (What did say BCCI Secretary devajit saikia trophy controversy?)
पाकिस्तानचे मंत्री आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वीकडून विजयाची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने स्पष्टपणे नकार दिला. भारताने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही, यामागील कारण आता समोर आलं आहे. भारताच्या या भूमिकेवर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीकडून ट्रॉफी स्वीकारता येणार नाही. “पण याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती आपल्या देशाला सादर करण्यात येणारी ट्रॉफी आणि पदके त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन जाईल. हे पूर्णपणे अनपेक्षित आहे, असं देवजीत सैकिया (Devajit Saikia) म्हणाले.
मोहसीन नक्वी कोण आहेत? (Who is Mohsin Naqvi?)
मोहसीन नक्वी सध्या एसीसीचे अध्यक्ष, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) प्रमुख आणि पाकिस्तानचे गृहमंत्री आहेत. ते कट्टर भारतविरोधी भूमिकेसाठी कुप्रसिद्ध आहेत. अनेकदा त्यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक व्यक्तव्य केली आहेत.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.