आयपीएल 2025 मध्ये आणखी एका बदलीची घोषणा! हंगामातून बाहेर गेलेल्या केकेआरच्या संघात नवा मिस्ट्री

शिवम शुक्ला कोलकाता नाइट रायडर्स: भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवरील वाढत्या तणावामुळे एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाचे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू झाले. स्पर्धेत आतापर्यंत 58 सामने झाले आहेत आणि 4 संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही समावेश आहे. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर गतविजेत्या कोलकाताने एक मोठा निर्णय घेतला आहे.

कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांसाठी त्यांच्या संघात बदल केला आहे आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोवमन पॉवेलच्या जागी मध्य प्रदेशातील युवा मिस्ट्री स्पिनर शिवम शुक्लाचा संघात समावेश करण्यात आला आहे. रविवारी फ्रँचायझीने त्याची अधिकृत घोषणा केली.

खरंतर, केकेआरने आधीच कळवले होते की, रोवमन पॉवेल आणि इंग्लंडचा मोईन अली हे दोघेही वैद्यकीय कारणांमुळे स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. फ्रँचायझीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की रोवमन आयपीएलमध्ये पुढे सहभागी होऊ शकणार नाही.

केकेआरच्या संघात नवा मिस्ट्री स्पिनर दाखल!

29 वर्षीय शिवम शुक्लाने आतापर्यंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा फक्त एकच हंगाम खेळला आहे, ज्यामध्ये त्याने एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने मध्य प्रदेश प्रीमियर लीगमध्येही चमकदार कामगिरी केली, जिथे तो 10 विकेट्ससह स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की आयपीएल 2024 चॅम्पियन केकेआरचे यावेळी जेतेपद राखण्याचे स्वप्न भंगले. बंगळुरूमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यामुळे संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. केकेआरचा आता लीग टप्प्यातील फक्त एक शेवटचा सामना बाकी आहे. केकेआर 25 मे रोजी दिल्लीत सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध आपला सामना खेळेल. आता शिवम शुक्लाला या सामन्यात संधी मिळते की नाही हे पाहणे मनोरंजक ठरेल आणि जर त्याला संधी मिळाली तर तो त्याच्या मिस्ट्री स्पिनरने काय चमत्कार करू शकतो.

हे ही वाचा –

Virat Kohli Tribute : हातात आरसीबीचा झेंडा अन् अंगात विराटच्या नावाची पांढरी जर्सी, चिन्नास्वामी स्टेडियम पाढंरशुभ्र झालं, पाहा फोटो

Virat Kohli News : ‘विराट कोहलीला भारतरत्न पुरस्कार द्यावा…’, 2011 च्या वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची भारत सरकारकडे मागणी

अधिक पाहा..

Comments are closed.