टीम इंडियाचा नवा कोच कोण? व्हीव्हीएस लक्ष्मण की गौतम गंभीर! मोठी अपडेट समोर

इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतले आहेत.त्यांच्या आईची तब्येत बिघडल्यामुळे गौतम गंभीर सध्या भारतात परतले आहेत. दरम्यान, एनसीएचे प्रमुख आणि माजी भारतीय खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण इंग्लंडमध्ये दिसले. त्यामुळे असे वृत्त समोर येत आहेत की, व्हीव्हीएस लक्ष्मण हेडिंग्ले कसोटी सामन्यात मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू शकतात. यासोबतच गौतम गंभीरच्या पुनरागमनाबद्दलही अपडेट देण्यात आले आहे.

गौतम गंभीर भारतात परत आल्यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण लंडनमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान, बीसीसीआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे की लक्ष्मण हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी इंग्लंडला गेले आहेत. ते सध्या तरी भारतीय संघाचा भाग होण्याची शक्यता कमी आहे. क्रिकबझच्या एका नवीन वृत्तानुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण सध्या टीम इंडियामध्ये सामील होणार नाहीत. लक्ष्मण काही कामासाठी इंग्लंडला गेले आहेत. असे सांगितले जात आहे की लक्ष्मण स्वित्झर्लंडच्या लॉसानेहून लंडनला पोहोचले आहेत. वृत्तानुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण क्रीडा कर्मचाऱ्यांना भेटण्यासाठी आले होते परंतु ते बीसीसीआयच्या अधिकृत कामासाठी तिथे गेले नव्हते.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे. या दरम्यान, गौतम गंभीर या सामन्यापूर्वी पुन्हा इंग्लंडला पोहोचू शकतील का असा प्रश्न उपस्थित झाला होता. वृत्तानुसार, गंभीर यांच्या आईच्या प्रकृती मध्ये सुधार होत आहे. त्या अजूनही आयसीयूमध्ये असल्या तरी त्यांची प्रकृती चांगली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर गौतम लवकरच इंग्लंड दौऱ्यावर परतू शकतो. हेडिंग्ले कसोटी सामन्यापूर्वी गंभीर संघात सामील होऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे.

Comments are closed.