T20I: टी20 इंटरनॅशनलमध्ये सर्वात वेगवान फलंदाज कोण? पहा संपूर्ण यादी

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा आता सर्वात लोकप्रिय फॉरमॅट ठरला आहे. चौकार-षटकारांची आतषबाजी करणारे खेळाडूच या फॉरमॅटमध्ये चाहत्यांच्या नजरेत खरे हिरो ठरतात. क्रिकेटच्या इतिहासात असे अनेक फलंदाज झाले आहेत ज्यांनी स्ट्राईक रेटच्या बाबतीत विक्रम पुस्तिकेत आपले नाव कोरले आहे. या यादीत भारताचा युवा स्टार अभिषेक शर्मा सर्वात वरच्या स्थानावर पोहोचला आहे.

भारताचा युवा ऑलराउंडर अभिषेक शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील आपल्या विस्फोटक फलंदाजीने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. 2024 ते 2025 दरम्यान खेळलेल्या 17 सामन्यांत त्याने 535 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 193.84 इतका राहिला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात जास्त आहे. अभिषेकने दोन शतके आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत. केवळ 276 चेंडूंमध्ये एवढ्या धावा करणे त्याच्या आक्रमक खेळशैलीचे उत्तम दर्शन घडवते.

एस्टोनियाचा साहिल चौहान हाही या यादीत सामील आहे. 22 सामन्यांत त्याने 479 धावा केल्या आहेत. त्याच्या कारकिर्दीतील सर्वाधिक धावसंख्या नाबाद 144 अशी आहे. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 184.23 राहिला आहे. छोट्या क्रिकेटिंग नेशनमधून आलेला असूनही चौहानने आपल्या झपाट्याने खेळलेल्या फलंदाजीमुळे स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे.

जिब्राल्टरच्या फलंदाज कैरोन स्टॅग्नोने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 25 सामन्यांत 656 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 177.29 इतका राहिला आहे. स्टॅग्नोच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतके नोंद आहेत. त्याने 56 षटकारे आणि 41 चौकार लगावून आपल्या पॉवर-हिटिंगची ताकद दाखवून दिली आहे.

सौदी अरेबियाचा फैसल खान हेदेखील या यादीत सामील आहेत. 61 सामन्यांत त्यांनी 1743 धावा केल्या आहेत. त्यांचा स्ट्राईक रेटही 173.43 इतका आहे. फैसलने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत एक शतक आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. 180 चौकार आणि 106 षटकार त्यांच्या आक्रमक शैलीचे स्पष्ट दर्शन घडवतात.

बेल्जियमचा फलंदाज साबेर जाखिल या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने 56 सामन्यांत 1163 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 169.04 इतका राहिला आहे. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि तीन अर्धशतके झळकली आहेत.

Comments are closed.