IPL 2026: हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोण किंग? विराट कोहलीच्या टीमची होणार खरी परीक्षा!
आयपीएल 2026 चा श्रीगणेशा आज, २८ मार्चपासून होत आहे. या हंगामातील सलामीचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. RCB ने IPL 2025 चे विजेतेपद पटकावले होते, त्यामुळे आता या नव्या हंगामाची सुरुवातही ते विजयानेच करण्यास उत्सुक असतील. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मोठा इतिहास राहिला आहे; विशेषतः IPL 2016 चा अंतिम सामना क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. चला तर मग, IPL 2026 सुरू होण्यापूर्वी या दोन्ही संघांच्या ‘हेड-टू-हेड’ रेकॉर्डवर एक नजर टाकूया.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत आयपीएलच्या इतिहासात एकूण 26 समोर खेळले गेले आहेत. यामध्ये सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड राहिले असून त्यांनी आतापर्यंत एकूण 13 समोर जिंकले आहेत, तर RCB ला केवळ ११ सामन्यांत विजय मिळवता आला आहे. दोन्ही संघांमधील दोन सामने टाय किंवा अनिर्णित राहिले आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील IPL 2026 चा हा पहिला सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांचे कर्णधार टॉससाठी ७:०० वाजता मैदानात येतील. प्रेक्षकांना हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि JioHotstar वर थेट पाहता येईल.
Comments are closed.