आयपीएल किंग कोण? विराट कोहलीचा नवा इतिहास!
आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे, तर या हंगामाचा शेवटचा सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे. मागील हंगामात कोलकाता नाईट रायडर्स यांनी विजय मिळवला होता. परंतु फलंदाजी मध्ये रॉयल चॅलेंजर्स चे विराट कोहली आणि गोलंदाजी मध्ये पंजाब किंग्स चे पेसल हर्षल पटेल यांचीच चर्चा जोरात चालू होती. आता जाणून घेऊयात की, आयपीएल मध्ये कुणी जास्त वेळ ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जिंकल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात 22 मार्च पासून होणार आहे, तर त्याचा शेवटचा सामना 25 मे रोजी खेळला जाणार आहे. पहिला सामना ईडन गार्डन मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स या दोन संघात होणार आहे. मागील हंगामात विराट कोहलीच्या बॅट ने चांगली कामगिरी केली होती. त्याने सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती. तर हर्षल पटेल ने पर्पल कॅप जिंकली होती.
आयपीएल 2024 मध्ये कोहलीने एकूण 15 सामन्यात 61.75 च्या सरासरीने आणि 154.69 च्या स्ट्राईक रेट ने 741 धावा केल्या. या दरम्यान कोहलीच्या बॅट ने 1 शतक आणि 5 अर्धशतक झळकावले. विराटने दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप आपल्या नावी करून घेतली. यामुळेच कोहली भारतातील असा खेळाडू बनला ज्याने प्रथमच दोन वेळा ऑरेंज कॅप जिंकली आहे. यापूर्वी कोहलीने आयपीएल 2016 हंगामात 973 धावा करून ऑरेंज कॅप जिंकली आहे.
दुसरीकडे वेगवान गोलंदाज हर्षल पटेल बद्दल बोलीचे झाले तर, त्याने 2024 हंगामात एकूण 14 सामन्यात 19.87 या सरासरीने आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेट ने 24 विकेट आपल्या नावी करून घेतल्या. हर्षल पटेल ने दुसऱ्यांदा पर्पल कॅप जिंकली आहे.
Comments are closed.