2025 मधील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे 7 फलंदाज! पाहा कोण आहे सिक्सर किंग

क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक षटकार लागतात. आता वनडे आणि कसोटी सामन्यांतही खेळाडू षटकारांचा वर्षाव करताना दिसतात. नुकत्याच झालेल्या भारत- इंग्लंड (IND vs ENG) मालिकेत वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या कसोटीत तुफानी खेळ करत चार चौकार आणि चार षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

2025 मध्ये आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूने ठोकले आहेत? या यादीत भारताचा दमदार फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) आणि अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) कोणत्या क्रमांकावर आहे.

2025 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकारांचा विक्रम करणबीर सिंह (ऑस्ट्रिया) याच्या नावावर आहे. त्याने 24 सामन्यांत 2 शतकांसह 1013 धावा करत तब्बल 74 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बहरीनचा फियाज अहमद असून, त्याने 29 सामन्यांत 943 धावा व 52 षटकार मारले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रियाचा बिलाल जलमाई आहे त्याने 28 सामन्यांत 43 षटकार झळकावले आहेत.

चौथ्या क्रमांकावर केमनचा जर्मेन बेकर असून त्याने 37 षटकार झळकावले आहेत. पाचव्या क्रमांकावर स्कॉटलंडचा हेनरी जॉर्ज मुन्से त्याने 36 षटकार ठोकले आहेत. सहाव्या क्रमांकावर बहरीनचा आसिफ अली 35 षटकारांसह आहे. सातव्या क्रमांकावर पाकिस्तानचा हसन नवाज आहे.

जर फक्त ICC फुल मेंबर देशांतील खेळाडूंचीच यादी बघितली, तरीही टॉप 7 मध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.
अभिषेक शर्मा 9व्या आणि रिषभ पंत 10व्या स्थानावर असून, दोघांनीही 2025 मध्ये आतापर्यंत 22 षटकार ठोकले आहेत.

ICC फुल खेळाडूंमधील टॉप सिक्सर लिस्ट

हसन नवाज (पाकिस्तान) – 33 षटकार

शाई होप (वेस्ट इंडिज) – 28 षटकार

टिम सेफर्ट (न्यूझीलंड) – 27 षटकार

हॅरी ब्रूक (इंग्लंड) – 25 षटकार

तंजिद हसन (बांगलादेश) – 24 षटकार

जेमी स्मिथ (इंग्लंड) – 24 षटकार

ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) – 23 षटकार

Comments are closed.