Who is walmik karad in maharashtra mantralay sudhir mungantiwar discusses financial help for rice farmers in vidarbha in marathi
सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि कापसाच्या मुद्द्यावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही त्यांनी सुनावले.
Maharashtra Assembly Session 2025 : मुंबई : सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड याचे नाव चर्चेत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान आणि कापसाच्या मुद्द्यावर बोलताना भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनाही त्यांनी सुनावले. ते म्हणाले की, आमचे मंत्री हुशार आहेत, पण मी सात टर्म आमदार आहे. फक्त सचिवानी सांगितलेलं उत्तर द्यायचे नसते. उत्तरात फक्त हो हे खरे आहे. हे खरे नाही असे म्हणालेत. मंत्रालयातील वाल्मिक कराड कोण आहेत, जे अशी उत्तर देतात असा सवाल त्यांनी केला. (who is walmik karad in maharashtra mantralay sudhir mungantiwar discusses financial help for rice farmers in vidarbha)
धान उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचा मुद्दा विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आला. या धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नसून ती का मिळत नाही असा प्रश्न भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला होता. आपल्याच सरकारविरोधात त्यांनी घेतलेला पवित्रा अनेकांना आश्चर्यचकित करून गेला. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मुनगंटीवार यांच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरावरून ते समाधानी दिसले नाही. त्यांनी अधिक टीका करत आपला मुद्दा आक्रमकपणे मांडणे सुरूच ठेवले.
हेही वाचा – Ashish Shelar And Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले, मी देखील चुकून काही काळ, आशिष शेलारांनीच दिले उत्तर
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “लष्करी अळीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 12 नोव्हेंबर 2024 रोजी प्रस्ताव पाठवला 37958 हेक्टरवरील भाताचे नुकसान झाले. अधिकारी म्हणाले की, आम्ही नुकसानीचे पंचनामे करायचे आदेश दिले नाही. नस्ती निपटारा कायद्यानुसार हे आदेश द्यायला हवे होते. नस्ती निपटारा कायद्याचा खून करणारे हे मंत्रालयातील वाल्मिक कराडचे नवे अवतार कोण आहेत, असा सवालही त्यांनी केला. जीआर नुसार याबाबतचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेणे गरजेचा आहे, ते करावे. पंचनामा देखील होणे गरजेचे होते, आता म्हणतायत की पंचनामे झाले नाही त्याला आम्ही काय करू ? ”
मी धान संदर्भातील प्रश्न सोडणार नाही
ते म्हणाले की, जीआरनुसार आपण पंचनामे केले नाहीत. सोयाबीनबाबत देखील हेच झाले. शेतकऱ्यांच्या विरोधात चुकीचे वागणाऱ्या अधिकाऱ्याला सोडलं नाही पाहिजे. मंत्रालयातील आधुनिक वाल्मिक कराड कोण? मलाही शासन निर्णय थोडा तरी कळतो, मी ही काही दिवस चुकून मंत्री होतो असा टोला त्यांनी लगावला. मी धान संदर्भातील प्रश्न सोडणार नाही आणि तुम्हाला ही सोडणार नाही. कारण मी भात खातो. धान उत्पादक शेतकरी यांचे पैसे देऊन टाका नाही तर मी सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तसेच लाखो रुपयांचा पगार घ्यायचा आणि शेतकऱ्यांच्या विरोधात अर्जाचा निपटारा करायचा नाही, अशा आधुनिक वाल्मिक कराड कोण हे शोधले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा – Jaykumar Gore : तेवढीही नीतिमत्ता त्यांना दाखवता आली नाही, हक्कभंगाचा प्रस्ताव मांडताना जयकुमार गोरे भावूक
Comments are closed.