कोण आहे झारा यास्मिन? युजवेंद्र चहलसोबत जोडलं नाव, बोल्ड फोटोजमुळे रातोरात चर्चेत

Yuzvendra Chahal Rumoured Girlfriend : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. युजवेंद्र आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जात आहे. युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चा समोर येत असताना आता युजवेंद्रचं नाव एका सुंदरीबरोबर जोडलं जात आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांचं नातं गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनल्याचं दिसत आहे. लवकरच यांचा घटस्फोट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच आता युजवेंद्र चहलची रुमर्ड गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे.

युजवेंद्र चहल अन् झारा यास्मिनच्या अफेअरची चर्चा

युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं असताना, दुसरीकडे त्याच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. एकीकडे युझी दुसऱ्या महिलेला डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे, यामुळे त्यांचं बिनसल्याचं बोललं जात आहे. तर त्याचा जुन्या रिलेशनशिप्सचीही जोरदार चर्चा रंगली आहे. युजवेंद्र चहलची डेटिंगल लाईफ सध्या खूप चर्चेत आहे. युजवेंद्र आणि धनश्रीच्या प्रत्येक फोटोवर या दोघांच्या नात्यात दुरावा येण्याचं कारण नेटकरी विचारत आहेत.

धनश्रीसोबत नात्यात दुरावा येण्याचं हेच आहे मूळ कारण?

सध्या युजवेंद्र चहलचं नाव बॉलिवूड अभिनेत्री झारा यास्मिन हिच्यासोबत जोडलं जात आहे. क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि झारा यास्मिन यांच्या अफेअरची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे युझीच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना, दुसरीकडे त्याच्या अफेअरची चर्चा आहे. लोक त्यांच्या डेटिंग लाईफ अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. दरम्यान, युजवेंद्र आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांबाबत कोणीही अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.

झारा यास्मिनचा अफेअरच्या बातम्यावर खुलासा

अभिनेत्री झारा यास्मिनने युजवेंद्र चहलबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. खरंतर, गेल्या काही काळापासून युजवेंद्र चहलने झारा यास्मिनला लग्नासाठी प्रपोज केल्याच्या बातम्या येत होत्या. असे म्हटले जात आहे की युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्राम लाईव्ह चॅटमध्ये अभिनेत्रीला प्रपोज केले होते. दरम्यान, ही घटना युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या लग्नापूर्वी घडली होती. पण आता चाहत्यांना हा जुना व्हिडीओ समोर आणला आहे आणि त्यांनी युजवेंद्र आणि धनश्रीच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना याराने स्पष्ट करा दिला आहे.

कोण आहे झारा यास्मिन ?

  • झारा यास्मिनचा जन्म 1994 मध्ये आसाममध्ये झाला.
  • झारा यास्मिन हिचं मूळ नाव खरे नाव रुखसार यास्मिन आहे.
  • झारा एक मॉडेल, अभिनेत्री आणि व्यावसायिक आहे.
  • झाराने अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये काम केलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

Comments are closed.