कोन बनेल सीएसकेचा पुढचा कोच? धोनीच्या सल्ल्यावर टीमने केला या दिग्गज खेळाडूचा विचार

चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा हेड कोच कोण असणार? हा प्रश्न अजूनही कायम आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी आयपीएल २०२६ नंतर सीएसकेची साथ सोडली होती. त्यांनी २००९ ते २०२६ पर्यंत संघासाठी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. पण प्रश्न अजूनही हाच आहे की पुढील हेड कोच कोण असेल? हळूहळू याचं उत्तर स्पष्ट होताना दिसत आहे. भारतीय संघाचे माजी फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडलेले हेमंग बदानी यांच्याकडे एक संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, एमएस धोनीची अशी इच्छा आहे की चेन्नईचा पुढचा हेड कोच कोणीतरी भारतीय असावा. सीएसकेचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर कासी विश्वनाथन यांनी सांगितले की, फ्लेमिंग दूर झाल्यानंतर फ्रँचायझीने धोनीकडे नवीन कोच शोधण्याची जबाबदारी सोपवली आहे.
बदानी यांना आयपीएलमधील कोचिंगसोबतच परदेशी लीगमध्येही कोचिंगचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने SA20, ILT20 आणि LPL चे विजेतेपद पटकावले आहे. अशा परिस्थितीत ते संघासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. तरीही, चेन्नईकडून अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
हेमंग यांनी २०२४ मध्ये दिल्लीच्या हेड कोचपदाची सूत्रे हाती घेतली होती. ते २०२६ पर्यंत संघासोबत जोडलेले राहिले. तथापि, त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाला कोणतेही विजेतेपद मिळवता आले नाही. आयपीएलच्या दृष्टीने त्यांचा रेकॉर्ड खराबच दिसतो. आता चेन्नई पुढील हेड कोचबद्दल काय अंतिम निर्णय घेते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
सर्वात यशस्वी आयपीएल संघांपैकी एक असलेल्या चेन्नईने आपले शेवटचे विजेतेपद २०२३ मध्ये जिंकले होते. त्या वेळी संघाने फायनलमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. तर त्याआधी हा संघ २०२१ मध्ये चॅम्पियन बनला होता. आता संघाला ट्रॉफी जिंकून ३ वर्षे उलटून गेली आहेत. आता फ्रँचायझीची पुढची ट्रॉफी कधी येते, हे पाहणे रंजक ठरेल.
Comments are closed.