सूर्यकुमार यादवच्या जागी कोण असेल टीम इंडियाचा नवा कर्णधार? टी20 वर्ल्ड कपनंतर ‘हे’ 3 असतील मोठे दावेदार!
टी20 वर्ल्ड कपची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून, या स्पर्धेच्या आयोजनासाठी आता 50 दिवसांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. सूर्यकुमार यादव या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. कर्णधार म्हणून सूर्याचा रेकॉर्ड आतापर्यंत खूप चांगला राहिला असून, त्याच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या 38 सामन्यांपैकी भारताने 28 सामन्यांत विजय मिळवला आहे तर केवळ ६ सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, फलंदाज म्हणून सूर्याची कामगिरी सध्या म्हणावी तशी चांगली होत नसल्याने, वर्ल्ड कपनंतर तो भारताचा टी20 कर्णधार नसेल, अशी चर्चा वर्तवली जात आहे.
टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया आगामी मोठ्या स्पर्धांचा विचार करून कर्णधारपदात बदल करू शकते. 2026 च्या टी20 वर्ल्ड कपवर लक्ष केंद्रित करून कर्णधार बदलला जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सूर्याच्या जागी शुभमन गिलकडे मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. जरी गिल सध्या (टी20) संघात नसला, तरी तो कसोटी आणि वनडेमध्ये भारताचे नेतृत्व करत आहे. तिन्ही फॉरमॅटसाठी एकच कर्णधार असावा या उद्देशाने प्रशिक्षक आणि निवडकर्ते गिलला संघात परत आणून त्याच्याकडे मोठी जबाबदारी सोपवू शकतात. याशिवाय, अक्षर पटेल सुद्धा कर्णधारपदासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Comments are closed.