आयपीएल रद्द झाली तर विजेता कोण? वाचा सविस्तर

भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम खेळांवर दिसून येत आहे, या कारणाने शुक्रवार रोजी बीसीसीआयने मोठा निर्णय घेत आयपीएल 2025 स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. आता आठवड्यानंतर बीसीसीआय परिस्थिती बघेल आणि सर्व फ्रेंचाईजी सोबत बातचीत करून पुढचा निर्णय घेईल. कोणताही समजूतदार व्यक्ती स्पर्धा रद्द केल्यावर यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा स्थगित झाल्याने बीसीसीआयचं करोडोंचं नुकसान झालेले आहे.

याच सोबत स्पर्धा जरी आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली असली तरी देखील स्पर्धेचा विजेता कोण होईल, हे प्रश्न उपस्थित होत आहेत? गुजरात, आरसीबी, पंजाब या संघांमध्ये ट्रॉफीसाठी जोरदार चुरस चालू आहे. त्याचबरोबर मुंबई देखील प्रयत्न करत आहे.

हिंदुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार बोर्डाचे प्रत्येक सामन्यामागे 100 ते 125 करोड रुपयांचे नुकसान होणार आहे. संपूर्ण बघायचे झाल्यास या स्पर्धेत 17 सामने खेळणे बाकी आहेत. यामुळे बीसीसीआयला एकूणच 2125 करोडोंचा फटका बसू शकतो. विमा कंपन्यांच्या मदतीनंतर देखील ब्रॉडकास्टिंग आणि सामन्यासंबंधित दुसरा इन्कम लक्षात घेऊन नुकसान खूप मोठे आहे.

आयपीएलमध्ये बीसीसीआयची सर्वात जास्त कमाई तिकिटांच्या विक्रीमुळे होते. आतापर्यंत 57 सामने खेळले गेले आहेत. तसेच 58वा सामना अचानक रद्द करण्यात आला. स्पर्धेतील आगामी काही सामन्यांचे तिकीट आधीच बुक केले होते, त्यामुळे बीसीसीआयला सर्व तिकीटे रिफंड करावी लागतील. यासोबतच मीडिया राइट्स, प्रमोशन आणि ॲडव्हर्टायझिंग सुद्धा बंद कराव्या लागतील.

जर काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आली नाही आणि स्पर्धा रद्द करावी लागली तर, बोर्डाला 5500 करोड रुपयांचे जाहिरातींचे नुकसान होईल. 10 फ्रेंचाईजींना सुद्धा याचे परिणाम भोगावे लागतील.

Comments are closed.