IPL: रवींद्र जडेजाची जागा कोण घेणार? जाणून घ्या सविस्तर
आयपीएल 2025 मधील निराशाजनक कामगिरीनंतर आता चेन्नई सुपर किंग्सच्या संघात अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. फलंदाजीमध्ये तर फक्त 3 जुनी नावेच दिसत आहेत. आयपीएल 2026 साठी फ्रँचायझीने अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर मोठा डाव लावला आहे.
अशा परिस्थितीत, जेव्हा सर्वजण सीएसकेच्या संभाव्य प्लेइंग 11 कडे पाहत आहेत, तेव्हा काही प्रश्न समोर येत आहेत. त्यातील सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, आता मॅच फिनिशरच्या भूमिकेत कोण दिसणार?
चेन्नई सुपर किंग्ससाठी संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजी करताना दिसू शकतात. तर दुसरीकडे, कर्णधार ऋतुराज गायकवाड तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. चौथ्या क्रमांकावर अनुभवी फलंदाज शिवम दुबेला संधी मिळू शकते. तसेच, डेवाल्ड ब्रेविसची पाचव्या क्रमांकावरील जागा निश्चित मानली जात आहे. फिनिशरच्या भूमिकेत आता कार्तिक शर्माला संधी दिली जाऊ शकते; कारण शर्माने या क्रमांकावर फलंदाजी करून अनेक धावा कुटल्या आहेत.
रवींद्र जडेजाच्या जागी या प्लेइंग 11 मध्ये प्रशांत वीरला संधी मिळू शकते. वीरला खरेदी करण्यासाठी फ्रँचायझीने मोठी रक्कम खर्च केली आहे. क्रमांक 8 वर यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी खेळू शकतो. तर दुसरीकडे, नूर अहमदची जागा प्लेइंग 11 मध्ये आधीच पक्की मानली जात आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये खलील अहमद आणि नॅथन एलिस यांचे स्थानही निश्चित दिसत आहे. याशिवाय, फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर फ्रँचायझी अकील हुसैनला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून वापरू शकते, तर सामान्य खेळपट्टीवर जेमी ओव्हरटनला खेळवले जाऊ शकते.
चेन्नई सुपर किंग्जचा संपूर्ण स्वॉड:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, आयुष म्हात्रे, महेंद्र सिंह धोनी (यष्टीरक्षक), उर्विल पटेल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, नॅथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, कार्तिक शर्मा (यष्टीरक्षक), प्रशांत वीर, अकील हुसैन, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, राहुल चाहर, मॅट हेन्री आणि जकारी फॉल्केस.
Comments are closed.