आयपीएल 2026 साठी रिटेन्शन लिस्टची तारीख कधी जाहीर होणार? जाणून घ्या सविस्तर

आयपीएल 2026 (IPL 2026) सिझनपूर्वी सर्व फ्रँचायझी आपल्या तयारीत व्यस्त झाल्या आहेत. आगामी हंगामामध्ये अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. काही संघांचे कर्णधारही बदलणार आहेत. या वेळच्या मिनी ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंचं नशीब खुलणार आहे. आयपीएल 2026 संदर्भात सर्व संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आयपीएल 2026 साठी सर्व संघ आपली रिटेन्शन लिस्ट कधी जाहीर करणार?

आयपीएलचे अधिकृत प्रसारक जिओस्टार यांनी स्पष्ट केलं आहे की, सर्व आयपीएल फ्रँचायझी 15 नोव्हेंबर रोजी आपली रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करणार आहेत. ही घोषणा भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाचव्या सामन्यानंतर करण्यात आली. मात्र, खराब हवामानामुळे सामना रद्द करण्यात आला होता, तरीसुद्धा भारताने मालिका 2-1 ने जिंकली.

रिपोर्ट्सनुसार, आयपीएल 2026 ची लिलाव प्रक्रिया डिसेंबरमध्ये होऊ शकते. अनेक हाय-प्रोफाइल खेळाडू संघ बदलण्याच्या तयारीत आहेत.
केकेआर (Kolkata Knight Riders) संघाला सध्या एक विकेटकीपर आणि कर्णधाराची गरज आहे. रिपोर्ट्सनुसार, केकेआर के.एल. राहुलला दिल्ली कॅपिटल्ससोबत ट्रेड करू शकते. गेल्या सिझनमध्ये के.एल. राहुलने दिल्लीकडून उत्कृष्ट कामगिरी केली होती.13 सामन्यांत त्याने 539 धावा केल्या होत्या.

तसेच, संजू सॅमसनही राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या विचारात आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी राजस्थान फ्रँचायझीसोबत प्राथमिक चर्चा सुरू केल्याचं सांगितलं जातं.

याशिवाय, केकेआरने वेंकटेश अय्यरला मागील सिझनमध्ये तब्बल 23.75 कोटींना विकत घेतलं होतं, पण तो अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे केकेआर त्याला रिलीज करू शकते.

सध्या केकेआरला एका स्थिर कर्णधाराची गरज आहे. मागील सिझनमध्ये अजिंक्य रहाणेने टीमची जबाबदारी घेतली होती, पण ती भूमिका त्याला फ्रँचायझीच्या अडचणींमुळे दिली गेली होती.

Comments are closed.