चौथ्या टी20 सामन्यात फलंदाज की गोलंदाज, कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या कशी असेल लखनऊची खेळपट्टी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका खेळली जात आहे (T20 Series IND vs SA) मालिकेतील चौथा सामना 17 डिसेंबर रोजी लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
पहिल्या तीन सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही खेळपट्टीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचे लक्ष सध्या लखनऊच्या खेळपट्टीवर लागले आहे. चाहत्यांना उत्सुकता आहे की, या मैदानावर षटकारांची बरसात होईल की गोलंदाजांची जादू चालेल?
इकाना क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सामान्यत गोलंदाजांना मदत करते आणि इथे गोलंदाजांची जादू चालते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळते. चेंडू जुना झाल्यावर फिरकी गोलंदाजही आपली कमाल दाखवताना दिसू शकतात. याच कारणामुळे दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एका अतिरिक्त फिरकीपटूला संधी मिळू शकते. लखनऊच्या खेळपट्टीवर धावा काढण्यासाठी फलंदाजांना बरीच मेहनत करावी लागणार आहे.
सध्या लखनऊमध्ये दव (Dew) पडत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दव पडल्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजांना थोडी अडचण येते. त्यामुळे लक्ष्य (Target) गाठणे (पाठलाग करणे) सोपे होते.नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला सामना जिंकण्याची मोठी संधी असेल.
Comments are closed.