IPL 2025 ची पहिली धडाकेबाज लढत! KKR vs RCB – कोण मारणार बाजी?

आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या हंगामाला उद्या म्हणजेच 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. 65 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघांमध्ये एकूण 74 सामने खेळले जाणार आहेत. तसेच 25 मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या 18 व्या हंगामाची सुरुवात 18 नंबरची जर्सी धुमधडाक्यात करेल. म्हणजेच हंगामाचा पहिला सामना उद्या किंग कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आरसीबी विरुद्ध गतविजेता संघ कोलकत्ता नाईट रायडर्स केकेआर यांच्यामध्ये होणार आहे. किंग खानचा केकेआर संघाला चौथ्या वेळेस चॅम्पियन्स बनायचे आहे. तसेच आरसीबी संघाला आयपीएलच्या पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे.

आरसीबीच्या फलंदाजी बद्दल बोलायचे झाल्यास विराट कोहली, फिल साल्ट, लियाम लिविंगस्टोन कर्णधार रजत पाटीदार आणि देवदत्त पडीकर असे मजबूत फलंदाज आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड सारखे मोठे गोलंदाज आहेत, तिकडे केकेआर संघाबद्दल बोलायचे झाल्यास, संघाची मोठी ताकद अष्टपैलू सुनील नरेन आणि आंद्रे रसल आहेत. याशिवाय फलंदाजीमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणे, क्विंटन डी कॉक, व्यंकटेश अय्यर आणि रिंकू सिंग यांच्यासारखे फलंदाज आहेत. तसेच फिरकीपटू वरून चक्रवर्ती त्याच्या चक्रव्यूहमध्ये विरोधी फलंदाजांना अडकवू शकतो.

दोन्ही संघांच्या हेट टू हेड रेकॉर्ड बद्दल बोलायचे झाल्यास, केकेआर आणि आरसीबी संघांमध्ये एकूण 34 सामने खेळले आहे. ज्यामध्ये कोलकाताने 20 सामने जिंकलेले आहेत. तसेच 14 सामन्यांमध्ये आरसीबीने विजय मिळवला आहे. आरसीबीचा केकेआर विरुद्ध सर्वोत्तम स्कोर 221 धावांचा आहे. तसेच केकेआरचा आरसीबी विरुद्ध सर्वोत्तम स्कोर 222 धावांचा आहे.

कोलकत्ता आणि बंगळुरू दोन्ही संघ उद्या जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरतील. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तसेच 20 षटकांचा हा सामना असेल. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात खेळला जाणार आहे.

Comments are closed.